प्रतिष्ठा न्यूज

तासगावातील लाईफकेअर हॉस्पिटल ठरत आहे रुग्णांच्या सोयीचे डॉ.सौ. सुचिता परदेशी : डॉ. सुचिता व डॉ.विनयकुमार परदेशी यांच्या हस्ते नवीन सर्जेरी विभागाचे उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नव्या तज्ञ डॉक्टरांच्यासह जोमात सुरू असलेल्या तासगावातील सुसज्य लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नव्याने सर्जरी विभागाचे उद्घाटन झाले असून,यामधे या विभागाचे प्रमुख डॉ.मोहमद आरिफ सर्जरी विभागाचे तज्ञ डॉक्टर आहेत,त्यांनी सर्जरी मधे मास्टर डिग्री घेतली आहे,यामधे पोटाचे विकार,अपेंडीक्स,हरनिया,मूळव्याध,स्तनांचा आजार,कॅन्सर च्या सर्व सर्जरी,सुंताचे सर्जरी,लॅप्रोस्कॉपिक सर्जरी,अशा सर्व प्रकारच्या सर्जरी आता तासगावच्या लाईफकेअर मध्ये होणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ विनय परदेशी म्हणाले की तासगाव सारख्या ग्रामीण भागात शहरी सुविधा माफक दरात रुग्णांना उपलब्ध करून देण्याचे शिवधनुष्य लाइफकेअर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलने लिलया पेलले आहे.हॉस्पिटल अत्यंत उत्तमरीत्या अल्पावधीतच रुग्णांच्या पसंतीस उतरले आहे.यावेळी  डॉ.अनिकेत हजारे,डॉ.किरण गायकवाड,डॉ.राहुल राठोड,संचालक डॉ.ज्ञानेश्वर शिवणकर,डॉ.विजय माने पाटील,डॉ.जहीर नदाफ,प्रताप घाटगे,नेत्ररोग चिकित्सक प्रथमेश यादव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय माने पाटील यांनी केले व प्रास्ताविक प्रताप घाटगे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संजय तुपे यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.