प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांना भक्त नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य चळवळीतील योगदान आणि विद्यार्थी विकासासाठी, गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत निष्ठापूर्वक काम करणारे एक उपक्रमशील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक, संवेदनशील कवी, लेखक आणि महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य शिवा कांबळे सर यांना नांदेड येथे दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात “भक्त नामदेव साहित्य पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे.
शिवा कांबळे सर हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमाने महाराष्ट्रात एक उपक्रमशील शिक्षक आणि साहित्यिक म्हणून सुपरिचित आहेत‌. त्यांचे प्रतिभेचा हिमालय : अण्णा भाऊ साठे, जे देशासाठी लढले आणि राष्ट्राच्या उद्धरणी हे चरित्रात्मक ग्रंथ ही प्रकाशित आहेत. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य चळवळीत मोठे योगदान असून सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य ही आहेत.
त्यांनी आजपर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय साहित्य संमेलन,विभागीय मराठी साहित्य संमेलनात आणि जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात सहभाग नोंदवून आपले योगदान दिले आहे. साहित्य चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना ‘भक्त नामदेव साहित्य पुरस्कार’ जाहीर झाल्याचे पत्र नानक साई फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
‘भक्त नामदेव साहित्य पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल शिवा कांबळे सर यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.