प्रतिष्ठा न्यूज

निमणीचें सुपुत्र 19 मराठा लाईफ इन्फन्ट्री सैनिक श्रीकांत सपकाळ यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : निमणीचें सुपुत्र १९ मराठा लाईफ इन्फन्ट्रीचे सैनिक श्रीकांत कुंडलीक सपकाळ यांचे दिनांक – १३/१०/२०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.आज रक्षा विसर्जना वेळी निमणी ग्रामस्थांच्या वतीने निमणीच्या सरपंच सौ रेखा रविंद्र पाटील यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.
यावेळी निमणी,नागाव,नेहरूनगर येथील ग्रामस्थ यांच्यासह नवनाथ राजमाने,अशोक कांबळे,बाबासाहेब देवकुळे,मारुती माने,भानुदास पाटील तुकाराम शिंदे लालासो पाटील,सुभाष पवार,प्रदीप पाटील,रामा पाटील,धोंडीराम चव्हाण भाऊसाहेब चव्हाण,सुजित पाटील आदी माजी सैनिक उपस्थित होते.
अत्यंत गरीब कुटुंबातील माजी सैनिक कै.कुंडलिक गोविंद सपकाळ यांची दोन्ही मुले सैन्य दलात भरती झाली होती.श्रीकांत यांना लेह लडाख येथे कार्यरत असताना त्रास सुरू झाला होता.चंदिगढ,पुणे येथील मिलीटरी दवाखान्यात त्यांच्या वर उपचार करण्यात आले होते.त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने आईच्या किडणीचे प्रत्यारोपणही करण्यात आले होते.
मात्र अखेर सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.त्यांच्या पश्चात आई,दोन भाऊ, पत्नी व २ वर्षाचा मुलगा आहे. क्रिकेटची आवड असणारा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा असलेने त्याच्या निधनाने पाचवा मैल,निमणी गावावर शोककळा पसरली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.