प्रतिष्ठा न्यूज

कर्तृत्ववान स्त्रीयांच्या सन्मानाचे प्रतिष्ठा फौंडेशनचे कार्य प्रेरणादायी : माजी खासदार निवेदीता माने; जयसिंगपूर येथे स्त्री प्रतिष्ठा सन्मान सोहळा उत्साहात; राज्यभरातील महिलांचा सहभाग

प्रतिष्ठा न्यूज
जयसिंगपूर प्रतिनिधी : कर्तृत्ववान स्त्रीयांच्या सन्मानाचे प्रतिष्ठा फौंडेशनचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी खासदार निवेदीता माने यांनी केले. जयसिंगपूर येथे प्रतिष्ठा फौंडेशनच्यावतीने आयोजित ८ व्या स्त्री प्रतिष्ठा सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. जयसिंगपूर येथील सोनाबाई इंगळे सभागृहात रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम झाला. राज्यभरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना स्त्री प्रतिष्ठा पुरस्काने सन्मानित करण्यात आले. गुरूवर्य सेवा प्रतिष्ठानच्या गुरूवर्य पुरस्कार सोहळा ही संयुक्तपणे पार पडला.
खासदार निवेदीता माने यांच्याहस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ. सौ. निता माने, सामाजिक कार्यकर्ते आप्पा पाटील उपस्थित होते. प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कु. प्रतिष्ठा जाधव, पूर्णांक जाधव, संतोष औंधकर यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. आभार सचिव सौ. विद्या जाधव मानले.
निवेदीता माने म्हणाल्या, प्रतिष्ठा फौंडेशनने अत्यंत सुंदर असा देखना कार्यक्रम घेतला आहे. स्त्रीयांचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्याचे काम प्रतिष्ठा फौंडेशन करत आहे. ही बाब स्त्रीयांना प्रोत्साहन देणारी आहे. काम करणार्‍या माणसाच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्याचे काम आपण करत आहात. स्त्रीया संघर्षयात्री असतात. स्वत:साठी कुटुंबासाठी आणि समाजासाठी सुध्दा त्या संघर्ष करत असतात. स्त्रीयांनी स्वत:ला मजबूत ठेवलं पाहिजे. स्वावलंबी राहिलं पाहिजे. तरच आपण आयुष्य सुखी आणि सुरक्षीत जगता येईल. त्याचबरोबर गुरूवर्य सेवा प्रतिष्ठानने समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांनाही प्रोत्साहन दिले आहे. पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन.
डॉ. सौ. निता माने म्हणाल्या, सर्व क्षेत्रात स्त्रीयांनी कर्तृत्व सिध्द केले आहे. कुटूंब सांभाळून कार्यक्षेत्रात काम करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. ही कसरत करत स्त्रीया यशस्वी झाल्या आहेत आणि होत आहेत. समाजाला दिशा देण्याचे काम स्त्रीया करत आहेत. आपल्या संस्कारांनी पीढी घडवित आहेत. अशा स्त्रीयांचा सन्मान प्रतिष्ठा फौंडेशन करत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.
प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव म्हणाले, समाजात अनेक माणसं कर्तृत्वाने मोठी आहेत परंतु त्यांच्या कार्याची दखल कोणी घेत नाही. अशा माणसांना आणि महिलांना सन्माना करून त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी आम्ही असे पुरस्काराचे कार्यक्रम घेत असतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, वेड्या महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न, महापूराच्या काळात संकटग्रस्त नागरीकांना मदत, दरवर्षी राज्यस्तरीय प्रतिष्ठा साहित्य संमेलन असे अनेक उपक्रम प्रतिष्ठा फौंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येतात.
शक्षणरत्न पुरस्कार :- सौ. सिमा अरूण कागवाडे (श्री दानलिंग विद्यालय, उमळवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर), सौ. सुजाता चंद्रकांत पाटील (प्रबुध्द भारत हायस्कूल लक्षतिर्थ वसाहत कोल्हापूर), सौ. जयश्री पाटील (मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा न. १ कुमठे ता. तासगाव), सौ. श्‍वेता आशिष मुळे (उपप्राचार्य, मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मिरज), प्रा. सौ. कांचन पुंडलिक सुतार (शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज), प्राचार्य सौ. सुनिता नवले (श्री. फत्तेचंद विद्यालय व ज्यु. कॉलेज चिंचवड पुणे), सौ. सुवर्णा संदेश जाधव (सिध्दी विद्या मंदीर सातारा), समाजरत्न पुरस्कार – ब्रह्माकुमारी सुलभा (संचालिका, धनकवडी केंद्र पुणे), सौ. भारती ढेंगे-पाटील (ग्रामविकास अधिकारी रा. जयसिंगपूर ता. शिरोळ), सौ. पुनम खिलारे (उमेद अभियान बचतगट, दानोळी ता. शिरोळ), स्त्री रत्न पुरस्कार – शोभा वसवाडे (सामाजिक कार्यकर्त्या इचलकरंजी, जि. कोल्हापूर),
आरोग्यरत्न पुरस्कार- सौ. पूजा घाटगे (आरोग्य सहाय्यीका पं.स. हातकणंगले), सौ. आशादेवी पाटील (लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, सहा. संचालक कोल्हापूर), श्रीमती मंगल पाटील (से.नि. आरोग्य सहाय्यीका, कसबा वाळवा, राधानगरी), सौ. सुनिता गडदे (आरोग्य सेविका कागल जि. कोल्हापूर), उद्योजिका पुरस्कार – सौ. मयुरी कदम (उद्योजिका तासगाव जि. सांगली), आदर्श माता पुरस्कार सौ. अलका सुरेश एडके (रा. दानोळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर), गुरूवर्यशिक्षणरत्न पुरस्कार – प्रा. सचिन बाबासाो पाटील – श्रीमती कस्तुरबाई वॉलचंद महाविद्यालय, सांगली, प्रा. अरविंद कृष्णा मानकर – से.नि. उपप्राचार्य, राधानगरी हायस्कूल ऍण्ड ज्यु. कॉलेज राधानगरी, श्री. मुर्गेश प्रकाश पाटील – जि. प. प्रा. शाळा नागाव कवठे ता. तासगाव, प्रा. किरण विनायक मधाळे – वॉलचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली, श्री. दिलीप निवृत्ती माने – पं. मोतीलाल नेहरू विद्या मंदीर क्र. ३६ इचलकरंजी, श्री. पांडूरंग मनोहर नाझरे – श्री शिवशंकर विद्यालय, इंगरूळ, ता. शिराळा, प्रा. संभाजी सदाशिव चव्हाण – सेकंडरी स्कूल ऍण्ड ज्यु. कॉलेज, भिलवडी ता. पलूस, धन्वंतरीरत्न पुरस्कार- प्राचार्य डॉ. योगेश राणू साळे – आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर, डॉ. प्रकाश हणमंत शेंडगे – गोटखिंडी, ता. वाळवा जि. सांगली, डॉ. प्रशांत हणमंत कोरे – वैद्यकिय अधिकारी, रूरल हॉस्पिटल, नसरी, ता. गडहिंग्लज, डॉ. वैभव सुभाष नायकवडी – वैद्यकिय अधिकारी, वाळवा जि. सांगली, साहित्यरत्न पुरस्कार – श्री. सुभाष दत्तात्रय चटणे – राष्ट्रपती पदक विजेते, पिंपरी चिंचवड, पुणे, सहकाररत्न पुरस्कार – श्री. मिलिंद रामचंद्र थोरात – चेअरमन, विश्वजीत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था वाळवा, संस्थारत्न पुरस्कार – श्री दानलिंग बहुउद्देशीय सेवा संस्था उमळवाड – उमळवाड, ता. शिरोळ जि. कोल्हापूर, उद्योगरत्न पुरस्कार – श्री. सुनिलकुमार आनंदराव माने – श्री सिध्देश्वर कॉम्प्युटराईज टेस्टिंग सेंटर अँड गोल्ड रिफायनरी, पटणा (बिहार), श्री. कुमार बापू पाटील – जयश्रीराम कोल्ड्रींक हाऊस ऍण्ड साई शुध्द पाणी सप्लायर्स मु. पो. भिलवडी ता. पलूस जि. सांगली, श्री. ओंकार अतुल हंगे – करपसश’ी आराध्या टाईल्स ऍण्ड ग्रेनाईटस्, पंढरपूर रोड, तासगाव फाट्या जवळ, मिरज, आरोग्यरत्न पुरस्कार – श्री. महेशकुमार मारूतीराव देशमुख – माजी चेअरमन, धन्वंतरी पतसंस्था, कोल्हापूर, श्री. लक्ष्मण बाबू साजणे – औषध निर्माता अधिकारी – प्रा.आरोग्य केंद्र अब्दुललाट, श्री. भगवान धोंडीराम पाटील – भडगाव ता. कागल जि. कोल्हापूर. प्रशासनरत्न पुरस्कार – श्री. चंद्रकांत मधूकर केंबळे – ग्रामविस्तार अधिकारी, कोल्हापूर, कृषीरत्न पुरस्कार – श्री. विजय अण्णा शिंदे – यशोदा कृषी एजन्सीज, भिलवडी. ता. पलूस, समाजरत्न पुरस्कार – श्री. भरतेश सुकुमार खवाटे – माजी सरपंच कोथळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर, ब्रह्माकुमारी डॉ. वैशाली बहन – ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय, केंद्र तासगाव

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.