प्रतिष्ठा न्यूज

वंचितांच्या मुलींना सायकली आणि कष्टकरी व्यक्तींना वाहनांचे वाटप करून पृथ्वीराज पाटील यांनी केले दसऱ्याचे सिमोल्लंघन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.१३: प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले व औद्योगिक सेलच्या वतीने वंचित आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील कष्टकरी वर्गाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी उद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन केले जाते.
सांगली शहर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेल व पृथ्वीराज पाटील फौंडेशन यांच्या पुढाकाराने सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री रोजगार योजनेतून पंजाब नॅशनल बँकेमार्फत वित्तसहाय्य लाभलेल्या टाटा एचटी गोल्ड ३ व टाटा एंट्रा २ अशा ५ फिरते विक्री केंद्र वाहनांच्या चाव्या वंचित घटकातील व्यक्तींकडे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.

वहान कर्जासाठी ४० अर्ज आले होते. सिबिल स्कोर पूर्ण होणारे १५ अर्ज मंजूर झाले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दत्तात्रय शेळके व सागर दुधाळ अभयनगर , पूजा खामकर हिराबाग काॅर्नर, प्रशिक कांबळे शास्त्रीनगर व अलका गोयकर खणबाग यांना वहानं वाटप झाली आहेत. उर्वरित दोन्ही टप्पे लवकरच पूर्ण होतील.. असे पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम यांनी सांगितले. याकामी चांगले योगदान दिलेले बिपीन कदम, आनंद कुलकर्णी व सुचेता कुलकर्णी, उद्योग भवनच्या प्रमुख विद्या कुलकर्णी, चेतन मोटर्सचे जनरल मॅनेजर सचिन कवडगे व विवेक माने आणि अजय देशमुख यांचा सत्कार पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाला.


व पृथ्वीराज पाटील यांच्या प्रेरणेतून मिरजेच्या स्माईल फौंडेशनकडून उपलब्ध झालेल्या २५
सायकलींचे वाटप गोरगरीब गरजू वंचित घटकांतील विद्यार्थींनीना पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
स्माईल फौंडेशनचे अशोकसिंग रजपूत यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, गोरगरीब वंचित घटकांच्या व उद्योजकांना वहानं आणि गरीब मुलींच्या शिक्षणासाठी सायकली देणं हे खरं दसऱ्याचं सिमोल्लंघन आहे. कठोर परिश्रम करुन व उद्योजकांनी आत्मनिर्भर होऊन आर्थिक प्रगती करावी व्यवसायात खूप मेहनत घेऊन या एका वाहनातून वर्षभरात दोन वहाने झाली पाहिजेत.विद्यार्थ्यीनीनी खूप अभ्यास करुन उज्ज्वल यश संपादन करुन चांगले करियर करावे. कष्ट आणि काटकसर हे यश देतात.’

करदर्शनम – सांगलीचा नवरात्रोत्सव या कार्यक्रम स्थळी झालेल्या या कार्यक्रमाला सौ. विजया पृथ्वीराज पाटील, बिपीन कदम,अजय देशमुख, सनी धोतरे, प्रा. एन.डी.बिरनाळे,एम. एन. हुल्याळकर, ताजुद्दीन शेख, अल्ताफ पेंढारी, अशोकसिंग रजपूत, प्रशांत देशमुख,समीर मुजावर, बाबगोंडा पाटील, मनोज लांडगे, विशाल सरगर, महावीर पाटील, मौला वंटमुरे, प्रशांत अहिवळे, आयुब निशाणदार, सच्चिदानंद कदम, गौस नदाफ, रमेश पाटील, रोहन खुटाळे व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.