प्रतिष्ठा न्यूज

शिवसेना गुंठेवारी विकास समितीच्या सांगली जिल्हा सचिवपदी अमित पवार यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : येथील पैलवान अमित नंदकुमार पवार यांची शिवसेना गुंठेवारी विकास समितीच्या सांगली जिल्हा “सचिव” पदी निवड करण्यात आली.

अमित पवार सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेले अनेक वर्ष सहभाग घेऊन समाजातील अनेक घटकांना न्याय देण्याची भूमिका पार पडतात. त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याने त्यांचा सर्व बाबींवर विचार करून प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी त्यांची निवड केली. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी  पूर्ण योगदान देणार असल्याचे अमित पवार यांनी  सांगितले. यावेळी  शिवसेना गुंठेवारी चळवळीचे  जनक प्रदेशाध्यक्ष चंदन दादा चव्हाण, महाराष्ट्र राज्य सदस्य युवराज मोने, सांगली जिल्हाध्यक्ष विजय बेल्लारी, सांगली शहराध्यक्ष प्रतीक पाटील, कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष रामदास सावंत, गुंठेवारीचे सांगली जिल्हा युवा अध्यक्ष रविराज कुकडे आदी महिला पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.