प्रतिष्ठा न्यूज

तासगावात सोमवारी सजग रहो शिवप्रेरणा यात्रा… तमाम हिंदू बांधवानी उपस्थित राहण्याचें आवाहन..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:तासगाव येथे सोमवारी सकाळी १० वाजता साने गुरुजीं नाट्यगृह येथे प्रखर हिंदूत्ववादी विचारांचे पुरस्कर्ते श्री.सुरेश चव्हाणके यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.सकल हिंदू समाज तासगाव,शिवप्रतिष्ठान, सांगली,हिंदू जनजागृती समिती,व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपिठ त्रंबकेश्वर शाखा तासगाव व शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतीक मंडळ आदी संघटनांनी या व्याख्यानांसाठी पुढाकार घेतला आहे.
श्री सुरेश चव्हाणके यांचे गोरक्षण, लव्ह जिहाद विरोध,राष्ट्रीयत्व यावर चांगला अभ्यास आहे.श्री चव्हाणके यांचे देशभरात प्रबोधनपर व्याखानांचे
आयोजन केले जाते.सध्या त्यांची शिवप्रेरणा यात्रा राज्यभरातील विविध ठिकाणी जात असून सजग रहो असे कार्यक्रमाचे शिर्षक असते.या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील तमाम हिंदू बंधू भगिनींनी घ्यावा,असे आवाहन सकल हिंदू समाज तासगावच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी भाजप किसान मोर्चा राज्य सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील,गोवींद सूर्यवंशी सर,सिद्धेश्वर लांब,संदीप सावंत,शितल पाटील, मयुरेश कुलकर्णी,गजानन खेराडकर उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.