प्रतिष्ठा न्यूज

आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान उपप्राचार्य एस एस मुटल यांनी नर्सिंग अभ्यासक्रम ,परीक्षा. तर डॉ. रश्मी श्रावस्ती यांनी विद्यार्थ्यांना नर्सिंगमध्ये असणाऱ्या विविध करियर संधी यावर मार्गदर्शन केले. अध्यक्ष आणि सचिवांनी नवीन विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा दळवी आणि ऋतुजा पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन प्रीती नरुटे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन शीतल दळवी, वैभव साखरे, प्रकाश शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.