प्रतिष्ठा न्यूज

विसापूर येथे जागतिक योगा दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : ग्रामपंचायत विसापूर आणि कै.रा.शा.माने पाटील विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज शाळेच्या पटांगणावर जागतिक योगा दिन योगा करून साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना योगा केल्याने शरीर व मन कशाप्रकारे निरोगी राहते याबाबत गणेश धोत्रे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य मोठ्या संख्येने विद्यार्थी,शाळेचे मुख्याध्यापक,सर्व स्टाफ,ग्रामस्थ,आरोग्यवर्धिनी चा स्टाफ,अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.