प्रतिष्ठा न्यूज

पटवर्धन हायस्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली येथील हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल सांगली. मधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष-2024-25 साठी उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी सांगली शिक्षण संस्थेचे संचालक व प्रशालेचे माजी विद्यार्थी मा.श्री.विपिन कुलकर्णी, प्रशालेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण पाटणकर प्रशालेचे माजी विद्यार्थी सी.ए विशाल जोशी, पुरूषोत्तम काळेबेरे, हेमंत क्षीरसागर, कुलदीप देवकुळे,डॉ.चंद्रकांत पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम इयत्ता 10 वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 मधील प्रशालेत प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झालेला ओमकार ढोले,द्वितीय क्रमांक पारस दरेकर,तृतीय क्रमांक समर्थ कांबळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच एन.सी.सी. कॅम्प मधील गुणवंत एन.सी.सी. कॅडेट विद्यार्थी कु.इच्छा पाटील, कु.वैष्णवी कदम, कु.शमिका लोखंडे, कु.दिशीता सुतार,आर्यन पाटील,रोहित कोळेकर,आदित्य माने या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एनसीसी चे ट्रेनिंग पूर्ण करून प्रशालेचे एन.सी.सी. ऑफिसर श्री.अमोल घोडके सरांचा ही विशेष सत्कार करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. तसेच सर्व नवीन विद्यार्थ्यांना 1974 सालचे माजी विद्यार्थी जयकुमार बाफना यांच्याकडून बिस्किट खाऊ म्हणून दिले. तसेच 1972 चे माजी विद्यार्थी मा.श्री राजेंद्र शहा यांनी नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लागणारा खर्च देणगी स्वरूपात दिला. शेवटी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शांता वडेर मॅडम यांनी केले. याप्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक राहुल संबोधी,पर्यवेक्षिका सौ. प्राची गोडबोले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.