प्रतिष्ठा न्यूज

चाबूकफोड आंदोलनाच्या धसक्याने चिंतामन रेल्वे उड्डाणं फुलावरून एकेरी वाहतूक सुरु; आंदोलन कर्त्याचा साखरवाटून जल्लोष

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी: दिनांक 1 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वा माधवनगर शहर व्यापारी असोसिएशन व विविध सामाजिक राजकीय नेते व कार्यकर्ते यांच्या वतीने चिंतामणी नगर येथील पुलावरून एक तर्फी वाहतूक पूर्ववत सुरु झाली याबद्दल *माजी आमदार नितीन राजे शिंदे व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज (भैय्या) पवार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रदीप*बोथरा* यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांना साखर वाटून आंदोत्सव साजरा करण्यात आला. पावणेदोन वर्षापूर्वी या पुलाच्या रुंदीकरण व नूतनीकरणासाठी सांगली शहर व आजूबाजूचे व्यापारी दृष्ट्या अनन्य साधारण महत्व असणाऱ्या चिंतामणी नगर पुलाचं काम सुरू करण्यात आलं. खरं म्हणजे हे काम अवघ्या आठ महिन्यांमध्ये पूर्णत्वास होणं असे अपेक्षित होते, परंतु कंत्राट दराच्या नियोजन शून्य कारभारामुळे या कामाला अपेक्षित वेळेमध्ये पूर्ण करता आलं नाही, यासाठी सातत्याने माधवनगर व्यापारी असोसिएशन व नागरिकांच्या वतीने वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलन करण्यात आली. एक महिन्याच्या पूर्वी व्यापारी असोसिएशन व माजी आमदार नितीन राजे शिंदे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैय्या पवार यांच्या नेतृत्वाखाली चाबूक फोड आंदोलन सुद्धा करण्यात आले. व त्या वेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी चाबूकफोड आंदोलनाचा धसका घेऊन लेखी स्वरूपामध्ये या पुलाचे काम 10 सप्टेंबर पर्यंत एकेरी वाहतूक चालू करून देण्याचे आश्वासन दिलेले होतं. *त्याचबरोबर 30 सप्टेंबर 2024 अखेर पुल नागरिकांच्या साठी वाहतुकी करिता दोन्ही बाजूने खुले करण्याचे आश्वासन दिलं होतं. *परंतु देर आये मगर दुरुस्त आये या म्हणीप्रमाणे 30 सप्टेंबर पासून एकेरी वाहतूक या पुलावरून सुरू झालेली आहे.* अजून दुसऱ्या बाजूचे पुलाचे काम पूर्णतःवास आलेले नाही.  त्यानिमित्ताने आज बैलगाडी वरून बैलांच्या नाकात वेसण घालून त्यांना लगाम घालून रेल्वे पुला वरून प्रतीकात्मक फेरी काढून साखर वाटण्यात आली व आनंदत्सव साजरा करण्यात आला. या आंदोलना मध्ये एक बैल रेल्वे प्रशासनाचा व दुसरा बैल कंत्राटदाराचा या नियमाने दोन्ही बैलांना वेसण घालून हा पूल पूर्णत्वास नेला. त्यांना वेसण रुपी लगाम घालून भविष्यात पुलाचे दुहेरी बाजूचे राहिलेले काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून देण्या साठी पुन्हा चाबूकफोड आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा वजा सूचना सुद्धा देण्यात आला. *तसेच झालेल्या कामाच्या दर्जा संदर्भात सुद्धा भविष्यामध्ये प्रश्न विचारण्यात येतील असा संदेश त्या ठिकाणी देण्यात आला.* ह्या वेळी माधवनगर व्यापारी असोसिएशन चे सर्व संचालक , तसेच माधवनगर गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ अंजू ताई तोरो, भाजप प्रदेश आघाडीच्या नेत्या सौ निता ताई केळकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजू आवटी ,  जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्ष श्री अशोक गोसावी सर , मंडलाध्यक्ष निलेश हिंगमिरे माधवनगर शहर भाजपा अध्यक्ष मनजीत भाऊ पाटील , माधवनगर व्यापारी असोसिएशन चे संचालक श्री. योगेश देसाई, रामनिवासजी बजाज, सचिव उमेश विचारे , दिलीपभाई शाह, रफिक अत्तार, बाळासाहेब दातार, हिंदू एकता आंदोलनाचे  मा. जिल्हा अध्यक्ष मा. संजय जाधव, शहर उपाध्यक्ष मा. राजू जाधव, विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, खाणभाग विभाग अध्यक्ष मा. अवधूत जाधव, प्रदीप निकम, श्री. मनोज साळुंखे,  चिंतामणीनगर व माधवनगर परिसरातील कार्यकर्ते श्री. शैलेश कुरळे, गणेश वाठारकर, ज्ञानेश्वर केंगार, अभिषेक तिवडे, सुहास कलघटगी व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. व ह्या आंदोलनात पहिल्या दिवसा पासून सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे माधवनगर व्यापारी असोसिएशन च्या वतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.