प्रतिष्ठा न्यूज

ग्रीनफील्ड पुणे बेंगलोर महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार – खासदार विशालदादा पाटील; शिष्टमंडळाला दिले आश्वासन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी: ग्रीनफील्ड पुणे बेंगलोर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मोबदला वाढवून मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगीतले. आज अ. भा. किसान सभेच्या वतीने व्यापक शिष्टमंडळ खासदार विशालदादांना भेटले. यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे याही उपस्थित होत्या. यावेळी बोलताना दोन्ही खासदारांनी सांगीतले राज्यभर महामर्गासाठी जमिन अधिग्रहण सुरु आहे. बाधित शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला आणी दिलासा रक्कम मिळत नाही. अशा अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या येत्या अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यात येईल असे सांगीतले.
मा. खासदार विशालदादा व मा. खासदार प्रणीती ताई यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सांगली जिल्ह्यातून पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड महामार्ग चार तालुक्यातून जात आहे. या महामार्गामध्ये सदतीस गावातील जमिनी बाधित होत आहेत.
शेतकऱ्यांनी आजपर्यंत या महामार्गाला विरोध न करता वाढीव मोबदल्याची मागणी केली आहे. कारण सरकारचे धोरण हे अधिग्रहित झालेल्या जमिनीस कमीत कमी मोबदला कसा मिळेल असे राहीले आहे. सरकारकडून रेडीरेकनरचा दर ग्रहीत धरुन मुल्यांकन केले जात आहे. आपल्याकडे रेडीरेकनरचे दर एकरी आडीच लाखापासून सहा लाखापर्यंत आहेत. त्या ठिकाणी बाजार भाव चाळीस लाखापासून साठ लाखापर्यंत आहेत.
आज आपल्या जिल्ह्यातील सिंचनयोजना पुर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी विकसित केल्या आहेत. कहीनी रोखीने भांडवल उभा केले, काही शेतकऱ्यांनी कर्जरूपाने भांडवल उभा केले आहे. अशा परिस्थितीत रेडीरेकनरचा बेस धरुन मुल्यांकन केल्यास बाधित शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. आगोदर आठ लेनचा महामार्ग प्रस्तावीत आहे असे सांगीतले जात होते. पण आता चौदा लेनचा होणार आहे अशी माहीती मिळत आहे. शंभर मिटर रुंदीच्या ठिकाणी दिडशे मिटर रुंदी करण्याची घोषणा मा. ना. गडकरीसाहेब यांनी केली आहे. त्यामुळे आणखी जास्त शेतकऱ्यांची जमिन अधिग्रहीत होईल असे वाटते. त्यामुळे या महामार्गात बाधित होणारा शेतकरी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या फक्त मुल्यांकनाचा प्रश्न नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बरोबर मधुन जात आहे त्या शेतकऱ्यांनी शिल्लक जमिनीची मशागत कशी करायची, विहीर , पाईपलाईन, स्थावर मालमत्ता यांच्या मुल्यांकन कसे होणार? पुर्वी असलेला महामार्ग त्याच्या लगत असलेली जमिन त्याचे मुल्यांकन दोन पटीने आणी टप्पा पद्धतीने करण्याबाबत सरकारने नव्याने काढलेले परिपत्रक की ज्यामुळे त्यांनाही कमी रक्कम मिळणार आहे. तेथील रेडीरेकनर जास्त असूनदेखील त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार नाही.
म्हणून आपणास विनंती आहे की या जमिनीचे मुल्यांकन करताना बाजार भाव समोर ठेवुन मुल्यांकन केले तरच शेतकऱ्यांना फायदा होईल अन्यथा शेतकऱ्यांना महामार्गासाठी जमिन देणे मुश्किल होईल. त्यासाठी आपण पुढाकार घेवुन शेतकऱ्यांना न्याय मिळवुन द्यावा ही विनंती. यावर मा. खासदार यांनी हे सर्व मुद्दे लवकरच मा. ना. गडकरी यांची भेट घेवुन त्यांच्यासमोर मांडण्यात येतील असे शिष्टमंडळास अश्वसित केले.

या शिष्टमंडळात काॅम्रेड उमेश देशमुख, सतिश साखळकर, विजय पाटील ,प्रकाश ईंगळे, शिवाजी शिंदे,अरुण निकम
उत्तम यलमर, धीरज देशमुख, माधव माने ,मल्हारी जगदाळे, शंकर दळवी, अरुण गायकवाड, सोहम जाधव, सुरेश गुरव, रामदास जाधव इत्यादी सह महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.