प्रतिष्ठा न्यूज

सांगलीमध्ये पालकांसाठी ‘पहिली पायरी’अभ्यासक्रमाची उत्साहात सुरुवात

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
सांगली :येथे ३ ते ६ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी क्वेस्ट संस्थेतर्फे ‘पहिली पायरी – बालवयातील वाचन, लेखन व गणित’ या कोर्सची सुरवात झालेली आहे. याचे आयोजन ‘संवाद बालक पालक ग्रुप’ यांनी केले. बालशिक्षण तज्ञ आणि प्रशिक्षक मीना निमकर यांनी सत्राची सुरुवात केली.
अलीकडच्या काळात शिक्षणक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहे. मुलांपर्यंत चांगले शिक्षण कसे पोहोचवावे यासाठी अधिक उपयुक्त मार्ग सापडत आहेत. हे मार्ग लहान मुलांच्या पालकांपर्यंत पोहोचवले तर मुलांच्या शिक्षणाचा पाया पक्का होऊ शकतो. या हेतूने पहिली पायरी कोर्सची निर्मिती झालेली आहे.
क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) ही संस्था गेली १७ वर्षे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कार्यरत आहे. बालशिक्षण, शालेय शिक्षण, संशोधन आणि शिक्षकांचे प्रशिक्षण या क्षेत्रात संस्थेचं प्रमुख योगदान आहे. पहिली पायरी हा कोर्स पुणे, कोल्हापूर व इस्लामपूर येथे सुरु होता. सांगली येथे पालकांसाठी काम करणाऱ्या अर्चना मुळे यांनी आपल्या शहरात हा कोर्स सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. ११ ऑगस्टपासून हा दोन महिन्यांचा कोर्स सांगली येथे सुरु झाला आहे.
सत्राची सुरुवात ‘वाचन म्हणजे काय?’ या प्रश्नाने झाली. पालकांची वाचनाकडे बघायची दृष्टी बदलत मुलांना पुस्तक कसे वाचून दाखवावे, त्या माध्यमातून त्यांना विचार करायला कसं शिकवावे, गणित विषयाचा पाया पक्का कसा करावा याबद्दल पालकांना मार्गदर्शन मिळाले. यासाठी मुलांसोबत घरी करायला कृती आणि त्यासाठी लागणारे साहित्य देण्यात आले. क्वेस्ट संस्थेच्या प्रशिक्षक मीना निमकर यांनी हे सत्र घेतले. त्यांना बाळासाहेब लिंबिकाई, आकाश भोर, सूरज उर्मिला यांनी सहकार्य केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.