प्रतिष्ठा न्यूज

श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलचे कराटेमध्ये घवघवीत यश

प्रतिष्ठा न्यूज
हरीपूर : १७ वर्षाखाली कराटे स्पर्धेत श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांगली जिल्हा क्रीडा परिषद व सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत घवघवीत यश मिळवले. मिरज येथील सुरेशभाऊ खाडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे पार पडलेल्या कराटे स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात प्रज्वल बंडू जाधव याने ४५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक तर ८२ किलो वजनी गटात श्रेयन बंडू लबडे याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच या स्पर्धेत अनिरुद्ध सचिन जाधव, वेदांत किरण कुबडगे, कु. अमृता अरविंद जाधव, कु. हर्षदा विनायक गायकवाड यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. प्रज्वल बंडु जाधव व श्रेयन बंडू लबडे या दोघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता विजय बेनिचेटगे यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक पूजा संजय पाटील श्री. राजकुमार हेरले यांचे मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ शिक्षक श्री.सुहास कोळी यांनी सर्वांचे कौतुक केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.