प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा येथील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र ची भेट

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.१५ : ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या नवीन स्थापन झालेल्या तालुका शाखा गगनबावडा कार्यकारिणीने गगनबावडा येथील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सदिच्छा भेट दिली व निवेदने दिली.यामध्ये तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, महावितरण, एसटी महामंडळ यांचा समावेश होता. “ग्राहकांचे प्रश्न संवाद व समन्वयाने सोडविले पाहिजेत” याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र व वरील कार्यालयाचे अधिकारी यांचेत एकमत झाले.
तहसीलदार डॉ.संगमेश कोडे, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी उदय गोडवे, पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी जी डी नलवडे, महावितरण चे कार्यकारी अभियंता विनायक जाधव, एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक शहाजी मडके यांनी निवेदने स्वीकारली.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सदस्य एस एन पाटील, तालुका अध्यक्ष भास्कर माने, उपाध्यक्ष तुकाराम पडवळ, संघटक गुरुनाथ कांबळे, सह संघटक पांडुरंग जाधव, महिला संघटक मेघा राणी जाधव, सचिव विलास पाटील, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.