प्रतिष्ठा न्यूज

फुले दाम्पत्यांचा कृतिशील वारसा चालवणारे आस्था बेघर केंद्र : सहा.आयुक्त चाचरकर

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : येथील सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिका दिन दयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत, चालवण्यात येणारे आस्था बेघर महिला निवारा केंद्र म्हणजे, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा कृतिशील वारसा चालवणारे केंद्र असल्याचे मनोगत. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी व्यक्त केले. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुमारी माता, निराधार बेघर, मनोरुग्ण महिला यांचा सांभाळ व पुनर्वसन करण्याचे अत्यंत कठीण काम सदर केंद्र करीत आहे. याकरिता महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे व संस्थाप्रमुख सुरेखा शेख हे नक्कीच कौतुकास पात्र आहेत, असे गौरव उद्गार त्यांनी काढले. तसेच संस्थेच्या देखरेखीखाली चालणारे सखी- वन् स्टॉप सेंटरच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतली. त्यांनी निवारा केंद्रातील सर्व व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी व्यवस्थापक रमजान खलिफा, पत्रकार दीपक ढवळे, गौतम कांबळे, मीना सुतार व बेघर केंद्रातील महिला उपस्थित होत्या. प्रस्ताविक व स्वागत संस्थाप्रमुख सुरेखा शेख यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.