प्रतिष्ठा न्यूज

सुनील पाटील यांना – “आस शिक्षक संघटनेचा” जिल्हास्तरीय “अध्यापक पुरस्कार” जाहीर

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : शहरातील विणकर कॉलनी येथील डॉ राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळेचे कृतिशील व हुन्नरी शिक्षक- सुनील पोपटराव पाटील यांना या वर्षीचा “आस शिक्षक संघटनेचा” जिल्हास्तरीय “अध्यापक पुरस्कार” जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्य “आस शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना” शाखा नांदेडच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक प्रोत्साहन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सन 2023 चा जिल्हास्तरीय “अध्यापक पुरस्कार” सोहळा दि.31 डिसेंबर 2023 रोज रविवारी सकाळी- 10:45 वाजता देवकृपा फंक्शन हॉल & लॉन पूर्णा रोड, छत्रपती नगर, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यात हा पुरस्कार सुनील पाटील यांना देऊन गौरव करण्यात येणार आहे. अशी माहिती “आस शिक्षक संघटनेचे” राज्याध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नांदेड यांनी दिली आहे.
सुनील पाटील यांना “आस शिक्षक संघटनेचा’ जिल्हास्तरीय “अध्यापक पुरस्कार” मिळाल्याबद्दल चौफाळा बिट क्र.03 मधील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.