खाडे पब्लिक स्कूलच्या मुलांची पाऊले थिरकली दांडियाच्या तालावर
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : भारतीय देश हा संस्कृतीप्रिय देश आहे. येथे प्रत्येक सण उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. याचप्रमाणे दास बहु उद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडु खाडे पब्लिक स्कूल मालगाव येथे नवरात्री सणाचे औचित्य साधत दांडिया रास याचे आयोजन केले होते. यावेळी मुलांनी टिपऱ्या व गाण्यांच्या धुंदीत फेर धरत दांडिया रास रचली व मनमुराद आनंद लुटला. या दांडिया रास उपक्रमात विद्यार्थिनींनी नऊ दुर्गांची वेशभुषा करत सर्वांचे लक्ष केंद्रित केले. यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील यांनी विद्यार्थ्यांना मुली व महिला यांना सन्मान देण्याचे आवाहन केले. तसेच स्त्री महतीविषयी माहिती सांगितली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष, पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.