प्रतिष्ठा न्यूज

नदीकाठी मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहावे तसेच त्यांना ईजा करण्याचा प्रयत्न करू नये : प्राणीमित्र मुस्तफा मुजावर

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : सकाळी नऊच्या दरम्यान अंकली येथील नवीन पुलाजवळ अजस्त्र आशा मगरीचे दर्शन आकाश कांबळे व बबलू चौगुले यांना झाले. ही बातमी प्राणीमित्र मुस्तफा मुजावर यांना कळताच त्यांनी या परिसराला भेट दिली. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. सकाळी बास्किंगला आलेली मगर ही पाण्यात जाताना तेथील नागरिकांना आढळून आली. तरी नागरिकांनी त्याला इजा करण्याचा व तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये असे आव्हान प्राणी मित्र मुस्तफा मुजावर यांनी तेथील नागरिकांना केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.