प्रतिष्ठा न्यूज

कै. गोपीनाथराव मुंडेंमुळे भाजपा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचला : आमदार सुधीरदादा गाडगीळ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : “भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने गोपीनाथरावांवर त्यांच्या तरुण वयात प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. या संधीचा फायदा घेत गोपीनाथरावांनी मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय जनतेला भाजपाकडे आकृष्ट केले. त्या समाजातील नवीन नेतृत्वाला पक्षात मोठी जबाबदारी देत पक्षात परिवर्तन घडविले. या नवनेतृत्वामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते भाजपात प्रवेश करू लागले. बेरोजगारांना नोकरी, शेतीमालाला हमीभाव, प्रत्येक शेतकऱ्यांच्या शिवारावर वीज, पाणी अशा जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलने, मोर्चे काढून जनतेला दिलासा दिला. भाजपा सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय होण्यात मुंडे साहेबांचे योगदान मोठे आहे. भाजपाचे सर्व कार्यकर्ते यासाठी मुंडेसाहेबांचे ऋणी आहेत.” असे भावपूर्ण विचार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले. आपल्या संपर्क कार्यालयात लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडेना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना ते बोलत होते.
यावेळी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, भाजपा प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, डॉ भालचंद्र साठे, अभिजित पाटील, अतुल माने, नितीन पाटील, प्रीती मोरे, गौस पठाण, गणपती साळुंखे, शशिकांत टेके, संतोष केस्तीकर आदी मान्यवर उपस्थित होते…

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.