प्रतिष्ठा न्यूज

स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदारांचा पंचगंगा साखर कारखान्यावरती रविवारी भव्य मेळावा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राज्यात एकूण साखर उत्पादना पैकी सर्वाधिक उत्पादन पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते या क्षेत्रात शेतकऱ्याचा ऊस तोडून तो कारखान्यापर्यंत पोहोच करण्याचे काम ऊस वाहतूकदारांच्या माध्यमातून गेल्ये अनेक वर्षापासून होत आहे म्हणून ऊस वाहतूकदार या व्यवसायातील प्रमुख घटक मानला जातो पण गेल्या अनेक वर्षापासून ऊस वाहतूक दारांची होत असलेली मोठ्या प्रमाणात फसवणूक त्यातून मजूर अणन्या करीता गेले असता त्यांच्यावरती होणारे खोटे गुन्हे आत्मघाती हल्ले पुढे जाऊन खून सुद्धा होत आहेत या व्यवसायातील फसवणुकीमुळे कर्जबाजारी होऊन ऊस वाहतूकदार आत्महत्या सुद्धा करत आहेत अशा या असंघटित शोषित ऊस वाहतूक दारांना एकत्रित करून स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदार संघटनेच्या माध्यमातून मा. खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या कुशल नेतृत्वात तसेच ऊस वाहतूकदारांचे मार्गदर्शक मा.श्री पृथ्वीराज संभाजी पवार यांच्या माध्यमातून राज्यव्यापी लढा ऊभा करण्याकरिता रविवार दिनांक 26/02/2022 रोजी
दे.भ.रत्नाप्पाण्णा कुभांर पंचगंगा साखर साखर कारखाण्यावरती सकाळी 11:00 वाजता कारखाना इंटक भवन येथे ऊस तोडणी वाहतूक दारांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे हा मेळावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा खा श्री राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच
मा.श्री. पृथ्वीराज पवार व मा.श्री. पि.एम.पाटील (चेअरमन पंचगंगा) यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे या मेळाव्यात ऊस वाहतूकदारांचे प्रश्न अडचणी भविष्यातील लढा उभा करण्याकरता चर्चा विनीमय होणार असुन मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी वाहतूक दांरानी उपस्थित रहावे असे आवाहन ऊस वाहतूक संघटनेच्या सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
असे पत्रक श्री. संदीप राजोबा. जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी प्रसिद्धिस दिले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.