प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

समस्त हिंदु मातंग समाजाचा सोमवारी सांगलीत मोर्चा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जातीच्या दाखल्यासाठी असणारी 50 वर्षा पूर्वीचा पुराव्याची अट रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी सोमवार दिनांक 11 सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या समस्त हिंदु मातंग समाजाच्या मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मोर्चाचे प्रमुख अभिमन्यू भोसले (नाना) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सर्किट हाऊस सांगली येथे  समस्त हिंदु मातंग समाज,निषेध मोर्चाच्या प्रमुख पदाधिकारी व मोर्चास पाठिंबा दिलेल्या संघटना यांची पत्रकार परिषद पार पडली.

मागील काही वर्षांपासून हिंदू मातंग समाजाचे ख्रिश्चन मिशनरी व पास्टर हे अंधश्रदेचा वापर करून, ख्रिश्चन संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून व धर्मांतरासाठी जिथं ज्या गोष्टींचा वापर करता येईल ते करून हिंदू मातंग समाजाचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केले आहे. हे करत असताना त्यांनीं आमच्या मातंग समाजाचे श्रद्धास्थान असणारे देवी देवतांच्या मूर्तीची ही विटंबना केली व त्यांच्याबद्दल अपशब्द ही काढले आहेत. अशा तक्रारी समाजातून आल्या आहेत. तर यासर्व गोष्टींचा निषेध म्हणून व   मिशनरी व पास्टर यांच्यवर गुन्हे दाखल करून त्यांच्यवर कडक कारवाई करावी. व ज्या ज्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून कागदोपत्री ख्रिश्चन न होता हिंदु मातंग दाखला दाखवून (SC) चे सर्व प्रकारचे फायदे व सवलती घेतल्या आहेत. अशा लोकांचा सर्वे करून त्यांच्यावर संविधानानुसार कडक कारवाई करावी व  हिंदू मातंग समाजाचे होणारे धर्मांतरण थांबवावे. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, क्रंतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील नियोजित जागेत व्हावे. जातीच्या दाखल्यासाठी असणारी 50 वर्षा पूर्वीचा पुराव्याची अट रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी सोमवार दिनांक 11 रोजी मा.जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या समस्त हिंदु मातंग समाजाच्या मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी समस्त हिंदू मातंग समाजाने बहु संख्येने यावे असे आवाहन मोर्चाचे प्रमुख श्री अभिमन्यू भोसले (नाना) यांच्याकडून करण्यात आले. यावेळी माजी आमदार श्री नितीन राजे शिंदे  व  श्री हणमंत पवार (शिव प्रतिष्ठान) यांनीही उपस्थित राहून मोर्चास आपला जाहीर पाठिंबा दिला व जास्तीत जास्त संख्येने या मोर्चास यावे हे आवाहन केले.

यावेळी  हिंदू मातंग समाजातील श्री. बंडू केंगार, श्री शंकर कांबळे, श्री कुमार वायदंडे, श्री सतिश बल्लाळ, श्री.बबन कांबळे, श्री अर्जुन कांबळे, श्री भीमराव बेंगलोरे, श्री. प्रमोद मोरे, श्री अतिश आवळे, श्री अक्षय कांबळे, श्री प्रतीक भंडारे, श्री मिलिंद घोडेस्वार, श्री सागर लोंढे, श्री श्री विकास आवळे, श्री चंद्रकांत आवळे श्री.संतोष मोरे, श्री अशोक कसबे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

*या मोर्चास पाठिंबा दिलेल्या संघटना*. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान सांगली जिल्हा, शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन, बजरंग दल, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट)

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.