प्रतिष्ठा न्यूज

रेल्वे पुलाबाबत नेत्यांशी नको, आधी स्थानिक जनतेशी बोला : नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार; प्रसंगी रस्त्यावर उतरणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जुना बुधगाव रस्त्यावरील पूल करण्याबाबत २७ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त नेत्यांशी चर्चा करून हा प्रश्‍न समजणार नाही. या रस्त्याचा वापर करणाऱ्या व पुलाच्या घाईघाईत कामामुळे बाधित होणाऱ्या जनतेशी आधी चर्चा करा आणि मग निर्णय घ्या, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे आणि भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी आज केली.
या दोघांनी चिंतामणनगर पुलाची आज पाहणी केली. तेथे एकही कामगार कामावर नाही. चार गर्लर बसणे बाकी आहे. किमान तीन ते साडेतीन महिन्याच्या आत हे काम होण्याची सुतराम शक्यता नाही. आधीच दोन्ही बाजूचे लोक पिचलेले आहेत, मग जुना बुधगाव रस्त्यावर बोळरस्ता करून मुख्य रस्ता बंद का करताय? या विरोधात जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका, असा इशारादेखील या दोन्ही नेत्यांनी दिला.
ते म्हणाले, की आम्ही आज व्यापारी, नागरिकांसह चिंतामणनगर पुलाची पाहणी केली. फक्त ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. ६० टक्के बाकी आहे. १५ ऑगस्टपर्यंत काम होईल, हा दावा फोल आहे. पुढील तीन-साडेतीन महिने काम होणार नाही. एवढा काळ सांगलीकरांची परीक्षा पहायची का? जुना बुधगाव रस्त्याला पर्यायी रस्ता चिंचोळा आहे. तेथे कोंडी होतेय. मोठा पाऊस आला, रेल्वे फाटक पडले, कोंडी झाला, काय मार्ग काढणार? उत्तर द्या, मग रस्ता बंद करा. २७ जुलैच्या बैठकीआधी लोकांशी चर्चा करा, मग नेत्यांशी बोला.
ते म्हणाले, की गेल्या दोन वर्षात माधवनगर पुलाबाबत ज्यांनी ब्र शब्द काढला नाही ते आता नव्या पुलाचे काम सुरु करा म्हणत आहेत. त्यांचा उद्देश सांगलीच्या जनतेचा खेळखंडोबा करण्याचा दिसतो आहे. या पुलात राजकारण नको, जनतेची सोय-गैरसोय या मुद्यावर बोलावे. ठेकेदाराच्या हितापेक्षा जनतेचे हीत आधी जोपासावे. ठेकेदाराला मुदतवाढ द्यावी. त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. अन्यथा, महिला, युवक, विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.’’

नेते चारचाकीत रस्ता दुचाकीचा

नितीन शिंदे व पृथ्वीराज पवार म्हणाले, की जुना बुधगाव रस्ता हा दुचाकीसाठी वापरात आहे. तेथून चार चाकी वाहन जात नाही. नेते चारचाकीतून फिरतात. त्यांना रस्ता चालू राहिला काय अन् बंद पडला काय, फरक पडत नाही. हा प्रश्‍न दुचाकीवरून जाणाऱ्या जनतेचा आहे, त्यांच्याशी चर्चा करून त्यावर मार्ग काढावा.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.