प्रतिष्ठा न्यूज

महापालिकेकडून गरजू 65 युवती व महिलांना ब्युटीपार्लर प्रशिक्षण : प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थीना जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्रीवहिनी पाटील यांच्याहस्ते प्रमाणपत्र वाटप

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीमार्फत मनपा क्षेत्रातील गरजू महिला व युवतींना देण्यात येत असलेल्या मोफत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षनाचा समारोप झाला. दोन महिन्याच्या या कोर्समध्ये
एकूण 65 महिला व युवतीना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण पर्ल ब्युटी सलून आणि इन्स्टिट्युटमार्फत देण्यात आले होते. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थीना महापालिकेत आयोजित कार्यक्रमात जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्रीवहिनी पाटील यांच्याहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

सहायक आयुक्त मानसिंग पाटील यांचे उपस्थितीत करण्यात आले होते. यामध्ये 65 महिला व युवती याना महापालिकेकडून दोन महिन्याकरिता मोफत प्रशिक्षण ब्युटी पार्लर प्रशिक्षण पर्ल ब्युटी सलून आणि इन्स्टिट्युटमार्फत देण्यात आले होते. कोर्स पूर्ण झालेल्या युवती व महिलांना जयश्री वहिनी पाटील यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास माजी नगरसेविका रोहिणी पाटील, पर्ल इन्स्टिट्युटच्या संचालक संगीता सूनके, महिला व बालकल्याण समिती सचिव स्मिता वाघमोडे व प्रशिक्षण घेणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.