प्रतिष्ठा न्यूज

एमआयडीसी रस्ते लाईटसाठी फक्त 6 कोटी मंजूर… खोट्या प्रसिद्धी साठी राष्ट्रवादी नेत्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करू नये शिवसेना नेते संजय चव्हाण

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगांव-कवठेमहंकाळ मतदार संघात चुकीच्या पध्दतीने प्रसिध्दी मिळविण्यासाठी ज्या एमआयडीसीला रस्ते लाईटसाठी ६ कोटी मंजूर असताना १८ कोटी निधी आणला म्हणून मोठ-मोठे चौका-चौकात डिजीटल लावण्यात आले आहेत,माझी राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळकळीची विनंती आहे जे काही सत्य असेल ते जनतेच्या समोर मांडण्यात यावे असे जनतेच्या मनात चूकीचा संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केले आहे.पुढे ते म्हणाले,सन १९९९ साली तासगांव व कवठेमहंकाळ तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहत मंजूर करण्यात आली आहे,सदर औद्योगिक वसाहतीला मंजूरी मिळाल्यापासून ती आजतागायत सुरू करण्यात आलेली नसून ती लवकर सुरू करण्याबाबत गेले अनेक दिवस मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेवून एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत होतो. परमेश्वराच्या कृपेने २८ डिसेंबर, २०२३ रोजी साहेबांना भेटून माझ्या तालुक्यातील बेरोजगारीची गंभीर परिस्थितीत त्यांच्या निदर्शनास आणून दिली.व एमआयडीसी चा संदर्भ घालून निवेदन देण्यात आले.तेथूनच साहेबांनी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांना फोन वरूनच योगेवाडी एमआयडीसीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले.मुख्यमंत्री साहेबांचे आदेशाचे पालन करीत १४ व्या दिवशी सांगलीच्या मुख्य एमआयडीसीच्या सी.ओ.ना मंजूरीचे पत्र देण्यात आले.ते पत्र आल्यानंतर तासगांव तालुक्याचे स्टॅडींग आमदार असल्यामुळे सुमन वहिनी यांच्याकडे ते पत्र पाठविण्यात आले.त्यांना असा भ्रम झाला की,एमआयडीसी त्याच्यामुळेच आली आहे.त्यामुळे त्यांनी २ तालुक्यात डिजीटल व जेसीबीतून आपल्या कार्यकर्त्याकडून गुलालाची उदळण आपल्यावर करून घेतली हा सगळा प्रकार पाहून आमच्यापुढे एक प्रश्न उभा राहिला नेमकी एमआयडीसी कुणामुळे आली याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी मी परत मुख्यमंत्री शिंदे साहेबांची भेट घेतली व त्यांना घडलेला प्रकार मोबाईलच्या माध्यमातून साहेबांना दाखवला, त्यावेळी साहेब नाराज होवून म्हणाले, एवढी वर्षे त्यांची असून त्यांच्यासाठी एमआयडीसी चा प्रश्न फार मोठा नव्हता,तरीसुध्दा त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही.त्यावेळेस एमआयडीसी सुरू झाली असती तर पहिली पिढी काम करून दुसरी पिढी त्या ठिकाणी काम करत असते.गेली २६ वर्षे तासगांव तालुक्यातील युवकांचे भविष्य कुजविण्याचे पाप या तालुक्यात झाले आहे, एमआयडीसी कुणामुळे आली याचा पाठपुरावा माझ्या माध्यमातून झाला आहे असे पत्र उद्योग मंत्रालयातून माझ्या नांवे पत्र दिले व स्वतः उद्योगमंत्री यांनी बाईट देखील दिली असून त्यात त्यांनी प्रामुख्याने सांगितले आहे,की या एमआयडीसी बद्दल कोणीही राजकारण करू नये,ही एमआयडीसी निव्वळ शिवसेनेच्या वतीने मंजूर झाली आहे साहेबांची बाईट व शासकीय पत्र असताना तरीही मी प्रसिध्दीसाठी प्रयत्न केला नाही.मला कुठल्याही श्रेयवादात पडायच नव्हत, माझा एकमेव हेतू होता की,ही एमआयडीसी चालू होवून युवकांच्या हाताला कामे मिळावीत व माझा तालुका बेरोजगारमुक्त व्हावा एवढेच या ठिकाणी तुमच्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून तासगांव-कवठेमहंकाळ मतदार संघात चुकीच्या पध्दतीने प्रसिध्दी मिळविण्यासाठी ज्या एमआयडीसी ला रस्ते लाईटसाठी ६ कोटी मंजूर असताना १८ कोटी निधी आणला म्हणून मोठ-मोठे चौका-चौकात डिजीटल लावण्यात आले आहेत,माझी या नेत्यांना ही कळकळीची विनंती आहे जे काही सत्य असेल ते जनतेच्या समोर मांडण्यात यावे असे जनतेच्या मनात चूकीचा संभ्रम निर्माण करू नये.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.