प्रतिष्ठा न्यूज

चोरी घटनांच्या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिसांकडून पाचवा मैल येथे ग्रामस्थांशी संवाद

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : निमणी,नेहरूनगर,पाचवा मैल परिसरात चोरीच्या घटना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक  महेश करचे व हेड कॉन्स्टेबल अरविंद, संकपाळ,जितेंद्र कांबळे,धाबुगडे, माळी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी  पाचवा मैल येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी पाचवा मैल येथे नागरिकांच्या माहितीसाठी बोर्ड लावण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक  करचे यांनी ग्रामस्थांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका,संशयित कोणी आढळल्यास त्याची संपूर्ण चौकशी करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी पोलीस पाटील सतीश अशोक पाटील,निमणीचे उपसरपंच राजेंद्र घोडके,माजी उपसरपंच आर डी पाटील,सांगली जिल्हा दक्षता समितीचे सदस्य विनय सपकाळ, पंडित राजमाने,दिलीप पाटील,विष्णू पवार,संपत राजमाने,दीपक देवकुळे, सतीश बुचडे,वैभव पाटील,सुनील जाधव,महादेव कोथळे,रमेश घोडके, राजू चव्हाण,सचिन मस्के,सुरेश पवार, विकास सकटे,लखन वाघमारे, आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.