प्रतिष्ठा न्यूज

केंद्रिय होमिओपॅथिक परिषदेच्या संशोधन प्रकल्पासाठी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या 3 विद्यार्थ्यांची शॉर्ट टर्म स्टूडंटशिप प्रोग्रमसाठी निवड झाली आहे. या प्रोग्रमसाठी संपूर्ण भारतामधून अंदाजे 1505 प्रकल्प प्रस्ताव देण्यात आले होते. त्यापैकी संपूर्ण भारतातून 190 विद्यार्थ्यांचे प्रकल्प प्रस्ताव निवड समितीने निवडले असून त्यातील गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, मिरज च्या सेजल विश्वकर्मा व वैभव पाटील तृतीय वर्ष, ऋषिकेष बालीगडे प्रथम वर्ष बीएचएमएस या 3 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव निवडले आहेत.

सदर तिन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. पृथ्वीराज गुलाबराव पाटील व विश्वस्त अॅड. विरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते तसेच त्यांच्या मार्गदर्शकांचे शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांना डॉ. अनिता नातू, डॉ. भाग्यश्री शिंगे, डॉ. समिर तांबोळी, डॉ. विवेक घाडगे, डॉ. उषा चावला यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी कॅम्पस कोऑर्डीनेटर डॉ. सतिश पाटील, प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे व प्रकल्प अधिकारी डॉ. शितलकुमार पाटील, डॉ. वैशाली सावंत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थापक-अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करून सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांचे प्रस्तावाची निवड झाल्यामुळे संस्थेच्या नावलौकिकामध्ये भर पडली असून अशीच शैक्षणिक गुणवत्ता उत्तरोत्तर वाढावी व नवनविन संशोधन करण्यासाठी संस्थेच्या वतिने नेहमीच सहकार्य राहिल याची ग्वाही दिली व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.