प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा अतिवृष्टी : ८७ घरांची पडझड :२७ लाखांचे वर नुकसान; तीन बंधारे पुन्हा पाण्याखाली

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता. २ : अतिवृष्टीमुळे या दोन दिवसात १६ घरांची पडझड झाली. आज अखेर तालुक्यात ८७ घरांची  पडझड होऊन २७ लाखांचे वर हानी झाली आहे. मांडूकली, शेनवडे, वेतवडे बंधारे पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.
आज अखेर सकाळी संपलेल्या चोवीस तासात  कोदे लघु प्रकल्प क्षेत्रात ४५७९ मि. मी.तर  मध्यम प्रकल्प क्षेत्रात३६८६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कुंभी त संचय क्षमतेच्या ८९. ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे.
दोन दिवसात १६ घरांच्या भिंती पडल्या  त्यामध्ये तिसंगी सात, पळसंबे तीन, साखरी दोन,व लोंघे, गगनबावडा, शेनवडे, खडूळे  येथील एका घराचा समावेश आहे. प्रशासनाने पंचनाम्याचे तातडीने आदेश दिले आहेत.

सोबत फोटो : गगनबावडा : जांभुळणेवाडी येथील विलास तुकाराम वरेकर यांचे घराची भिंत कोसळली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.