प्रतिष्ठा न्यूज

आमदार विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज पाटील फौंडेशन तर्फे बेघरांना अन्नदान

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.१३ : राज्याचे माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सावली बेघर निवारा केंद्रात पृथ्वीराज पाटील फौंडेशनने बेघर वृध्दाना फळे व अल्पोपाहार वाटप केले.
सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.पृथ्वीराज पाटील, फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम आणि वेटलिफ्टींगचा राष्ट्रीय खेळाडू संकेत सरगर यांच्या हस्ते निवारा केंद्रातील बेघरांना फळे व अल्पोपाहार वाटप करण्यात आले.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज पाटील फौंडेशन तर्फे बेघरांना अन्नदान करुन फौंडेशनने मानवतावादी कार्य केले आहे. समाजातील गोरगरीब,वंचित, बेघर आणि प्रवाहातून बाहेर फेकले गेलेल्या लोकांना आधार देण्यासाठी शासन व स्वयंसेवी संस्था पुढे आल्या पाहिजेत. पृथ्वीराजबाबांनी निवारा केंद्रांची पहाणी करुन केंद्रातील बेघर व मुस्तफा मुजावर यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या बिपीन कदम यांनी अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.. आम्ही आज डॉ. कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सावली बेघर निवारा केंद्रात अन्नदान करुन बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत असे सांगितले. निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर, प्रशांत देशमुख, रविंद्र वळवडे, मनोज लांडगे, सतीश गोरे, आशिष चौधरी, राजेंद्र कांबळे, शितल सदलगे, अक्षय पाटील, अमोल जाधव व निवारा केंद्रातील ७०बेघर नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.