प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत पहिला शेकोटी सिंगिंग कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीत पहिला शेकोटी सिंगिंग कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर आणि शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यानी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला सांगलीकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हिवाळा आणि बोचरी थंडी लक्षात घेता दीपक चव्हाण यानी सांगलीकर नागरिकांना गाण्यातून उब मिळावी आणि या थंडीत रसिकांना संगीत गाण्यांची मेजवानी मिळावी या उद्देशाने मित्रमंडळ चौक येथे पहिला शेकोटी सिंगिंग कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी समाजसेविका जयश्रीताई पाटील आणि गायिका सोनाली केकडे यांच्याहस्ते शेकोटी प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण, गायिका सुजाता पाटील, राजन करंजकर, नारायण कुकरेजा , सोनाली केकडे, सुहास फडतरे, आरिफ शेख, प्राजक्ता वाघमारे, विशाल कांबळे, अविनाश शितोळे यांनी आपली गाणी सादर करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. रफिकअमीन भालदार यांच्या बहारदार मिमिक्री सर्वांना खळखळून हसवले. कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या रसिकांसाठी आयोजित लकी ड्रॉ मधून अजय नानवाणी यांचेकडून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास युसुफ जमादार, सोमनाथ सूर्यवंशी, अहमद शेख, नाना पळसे, जय कुकडे, जेष्ठ पत्रकार मोहन राजमाने यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्रसिद्ध गायक गिरीश लोहाणा, फहीम खान, सुनीता चव्हाण, राजू मगदूम, शोभा पाटील, रजनी रजपूत, गोडसे सर, राजश्री मोहनानी, आदींसह संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच रसिकांनी उपस्थिती लावली होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.