प्रतिष्ठा न्यूज

बालचित्रकार ओम कुंभार याच्या हस्ते अंनिसच्या फेब्रुवारी अंकाचे प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज / सांगली प्रतिनिधी
सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनावरील शिल्प व चित्र प्रदर्शन सांगली येथे नुकतेच उत्साहात पार पडले. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील निमणी येथील पंचक्रोशी विद्यानिकेतनचा विद्यार्थी कु. ओम नंदकुमार कुंभार, इ. ९ वी याच्या ‘अंधश्रद्धेचे जोखड’ या चित्रास प्रथम क्रमांक मिळला होता. कुंभार याचे हे प्रथम क्रमांकाचे चित्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाच्या फेब्रुवारी अंकाच्या मुखपृष्ठावर घेऊन त्याचा सन्मान केला गेला. या अंकाचे प्रकाशन बालचित्रकार ओम कुंभार यांचे हस्ते त्याच्या शाळेतच करण्यात आले. यावेळी तासगाव अंनिस शाखा व राष्ट्रसेवा दल शाखा तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबुराव गुरव यांच्या हस्ते ओम कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. डॉ. बाबुराव गुरव म्हणाले की, “ओम याने चित्रकलेचा उपयोग समाजप्रबोधनासाठी केला आहे. मुलांनी अंगभूत कलागुण जोपासले पाहीजेत आणि अभ्यासाबरोबरच इतर गुणांना चालना दिली पाहिजे. अंनिस वार्तापत्राच्या मुखपृष्ठावर ओम कुंभार यांचे प्रथम क्रमांक मिळवलेले चित्र छापण्यात आलेमुळे आज आपल्या शाळेतील एक विद्यार्थी महाराष्ट्रभर पोचणार आहे याचा अभिमान आहे, ओमच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा”

राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या नुतन परीट म्हणाल्या की, ओमला चित्रकलेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक तितकेच अभिनंदनास पात्र आहेत.

तासगाव अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष अमर खोत म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील २७५ विद्यार्थ्यांमधून आपल्या तासगाव तालुक्यातील निमणी मधील अतिशय छोट्या गावातील ओम कुंभार यांने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला ही आमच्या साठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे.

या कार्यक्रमास पंचक्रोशी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम गुरव, दिनकर शेळके, शिवाजी राजमाने, दिपक गवळी, रामचंद्र गुरव, गीतांजली सुतार, नेहा हाक्के, अमोल ठोंबरे, कपील तळवे, प्रा. वासुदेव गुरव आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.