प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला. वाहतूक बंदच , घरांची पडझड, लाखोंचे नुकसान

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला. आज दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर- गगनबावडा महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहिला. कुंभी नदी अद्यापही पात्राबाहेर असून वेतवडे, मांडुकली, शेनवडे बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा परिसरात १६७ मि. मी. तर कुंभी धरण क्षेत्रात  १०६ मि. मी. पाऊस पडला असून आज अखेर २८५९मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भात पिकेही पाण्याखाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
तालुक्यात एका घरासह चार गोठ्यांची पडझड
लोंघे येथील संपदा महादेव पाटील यांच्या गोठ्याची भिंत पडून ६० हजारांचे नुकसान झाले,व आक्काताई बाळकू पाटील यांच्या गोठ्यांची भिंत पडून ६० हजारांचे नुकसान झाले. असंडोली येथील बंडोपंत राजाराम पावसकर यांच्या गोठ्यावर झाड पडून वीस हजारांचे नुकसान झाले. तर आनंदा पांडुरंग रावण यांचे घराची भिंत कोसळून ३५ हजारांचे नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने पंचनामे केले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.