प्रतिष्ठा न्यूज

सिंगल युज प्लास्टिक बाबत मनपा कडून कारवाई : 33 आस्थापनेवर कारवाई करून 16000/- इतका दंड वसूल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आज दि ३/१/२०२४ रोजी मनपा वतीने सांगली विभाग मध्ये सिंगल युज प्लास्टिक बाबत कडक कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण कायदा २००६ अंतर्गत प्लास्टिक आणि थर्माकोल इत्यादी पासून बनवलेल्या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, साठवणूक, वाहतूक आधी, यावर, सूचना
२०१८ प्रमाणे एकल वापर प्लास्टिक वर बंदी घालण्यात आलेली आहे.
अशा एकल वापर

प्लास्टिक वापर करणाऱ्या व्यक्तींवर स्पॉट फाईन/दंड पाचशे रुपये तथा याचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर प्रथम दंड पाच हजार रुपये इतका आहे.

या अनुषंगाने आज माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या सूचनेनुसार उप आयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ ताटे यांच्या नियंत्रणा खाली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिके कडून सांगली विभागात विविध ठिकाणी सिंगल युज प्लास्टिक बाबत कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये आज प्रामुख्याने फळ विक्रेते, भाजीविक्रेते, फुल हार विकणारे, तसेच मटन चिकन शॉप, किराणा स्टोअर, बेकरी, आदी.. आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये प्लास्टिकचे स्ट्रॉ, कॅरीबॅग, प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकच्या वाट्या, व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. बंदी असलेल्या वस्तूंचे विक्री केल्याबद्दल आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे .

या मध्ये प्लास्टिक स्टिक ईयर-बड, फुग्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिक झेंडे, कॅण्डी स्टिक, आइस्क्रिम स्टिक, सजावटीसाठी वापरलं जाणारं पॉलिस्टाइनिन (थर्माकोल), प्लास्टिक प्लेट, कप, ग्लास, चमचे, काटे चमचे, चाकू, ट्रे, स्टरर, ५० मायक्रोनहून कमीचं प्लास्टिक, अशा वस्तूंच्या विक्री आणि वापरावर बंदी केली आहे.

यावेळी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनिस बारगीर, पर्यावरण अभियंता अजित गुजराती,ऋषिकेश किल्लेदार, शहर समन्वयक वैष्णवी कुंभार, आणि सर्व एस आय उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.