प्रतिष्ठा न्यूज

मराठीला पुन्हा चांगले दिवस नक्कीच येतील : डॉ. प्रतिभा पैलवान; हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
इचलकरंजी प्रतिनिधी : मराठीला पुन्हा चांगले दिवस येतील. नक्कीच येतील आणि मराठी पुढच्या पिढ्यांना स्वतःच्या पायावर उभी राहण्यास सक्षम बनेल. असे प्रतिपादन राजहंस फौंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा पैलवान यांनी केले. येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर शाळा क्रमांक 28 चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. त्यावेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.

आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, सादरीकरण आणि सूत्रसंचालन सगळेच एकदम सर्वोत्कृष्ट होते.
आजकाल मराठी भाषा आणि मराठी शाळा यांची झालेली दुरावस्था पाहून मनाला वेदना होतात. एक मराठीची प्राध्यापक म्हणून कधीकधी खूप चीड सुद्धा येते. परंतु एका नगरपालिकेच्या मराठी शाळेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा पाहून खरंच असं वाटलं की मराठीला पुन्हा चांगले दिवस येतील. नक्कीच येतील आणि ही आपली भावी पिढी तिच्यावरती पुढच्या अनेक पिढ्या अवलंबून आहेत. स्वतःच्या पायावर उभी राहण्यास सक्षम बनेल.
खरं तर जेमतेम तीन ते चार खोल्या असणारी हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर शाळा क्रमांक 28, ही शाळा जुना चंदुर रोडवरील दुर्गामाता मंदिर च्या बाजूलाच मोठ्या दिमाखात सुरू आहे. पन्नास एक विद्यार्थ्यांवरती सुरू झालेली ही शाळा आज 325 हून अधिक विद्यार्थ्यांना ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्काराचे धडे देत आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की माझा मुलगा यज्ञेशही याच शाळेमध्ये शिकतो.
जेवढा माझा अनुभव आहे त्यावरून मला असं वाटतं की, इथल्या शिक्षकांचे सांघिक कष्ट खुप महत्वाचे आहेत.
या शाळेमधील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी जे कष्ट घेतात त्याला खरंच तोड नाही.
आजचे वार्षिक स्नेहसंमेलन त्याचे एक उत्तम उदाहरण होतं. यामध्ये अगदी गणेश वंदना पासून बंगाली, पंजाबी, आदिवासी, मराठी, गुजराती, देशभक्ती, कथा, कविता, गोष्टी, गाणी या सर्वांना एकत्र करून एक सुंदर सोहळा त्यांनी बसवलेला होता आणि त्याला विद्यार्थ्यांनीही तितकीच उत्स्फूर्त दाद दिली होती. हे पाहून मन आणि डोळे दोन्ही सुखावले.
आम्ही ज्या मराठी शाळांमध्ये शिकलो, लहानाचे मोठे झालो, संस्काराचे धडे गिरवले ते सगळं आज पुन्हा नव्याने जगायला मिळालं. आमचे शिक्षक आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा आठवले हेच या कार्यक्रमाचे यश आहे. असं म्हणावं लागेल.
प्रत्येक मराठी शाळेतल्या शिक्षकांनी जर असा विचार केला आणि असे कष्ट घेतले तर नक्कीच मराठी शाळांना पुन्हा एकदा चांगले दिवस येतील यात शंका नाही. आज पर्यंतच्या आयुष्यात पाहिलेलं, अनुभवलेलं एका मराठी शाळेचं हे अप्रतिम स्नेहसंमेलन होतं.
यामध्ये या शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवूडकर सर ,तसेच श्री.लोंढे सर, श्री.शिंदे सर ,श्री पांनदारे सर ,श्री .कांबळे सर ,सौ.पाटील मॅडम,सौ.शिंदे मॅडम,सौ .माने मॅडम ,सौ .कुंभार मॅडम,सौ .गुरव मॅडम ,सौ .खराडे मॅडम व सौ.बनकर मॅडम हा सर्व शिक्षक वृंद व मा.श्री.पैलवान अमृत मामा भोसले यांचे शाळेला असलेले मोलाचे सहकार्य यामुळे ही शाळा नक्कीच खूप पुढे जाईल. यात शंका नाही. आपण सर्वांनी घेतलेल्या कष्टाला मनापासून सलाम मनापासून धन्यवाद आणि सर्व शिक्षक वृंद यांचे मनःपूर्वक अभिनंदन भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.