प्रतिष्ठा न्यूज

वाईचे महसूल सहायक- दत्ता सिरसाट यांचा सातारा येथील जिल्हाधिकारी यांचे कडुन गौरव

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :  दरवर्षी 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन व सप्ताह म्हणून साजरा केला जातो. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती मदतकार्य, महसुली वसुली, प्रशासना मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला जातो.
सन- 2022- 23 या वर्षा मध्ये उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल लोहा तालुक्यातील उमरा येथील भूमिपुत्र असलेले व सद्या सातारा जिल्ह्यातील वाई तहसिल कार्यालया मध्ये महसूल सहायक पदावर कार्यरत असलेले दत्ता विठ्ठलराव सिरसाट यांचा महसूल दिनी दि.1ऑगस्ट 2023 रोजी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी- मा.जितेंद्र डूडी, अप्पर जिल्हाधिकारी- मा.जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी- मा. प्रशांत आवटे, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना- मा. विजया यादव मॅडम, उपविभागीय अधिकारी सातारा- मा. सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी पाटण- मा. सुधीर गाढे, यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.मा. जिल्हाधिकारी सातारा यांच्या कडुन दत्ता सिरसाट यांचा गौरव करण्यात आल्याबद्दल उमरा येथील गावकऱ्यानी अभिनंदन केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.