प्रतिष्ठा न्यूज

कविता जगण्याचा दृष्टिकोन देते : कवयित्री रचना

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आम्ही सिद्ध लेखिका, सांगली, नगरवाचनालय सांगली व साहित्याक्षर प्रकाशन,अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कवी समजून घेताना ‘ कार्यक्रम नगरवाचनालय सांगली येथे संपन्न झाला.या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध कवयित्री रचना यांना निमंत्रित केले होते.त्यांनी एक तास आपल्या कविता सादर केल्या व रसिकांशी संवाद साधला.कार्यक्रमाचे प्रास्तविक कवयित्री स्नेहा कोळगे यांनी केले .भूमिका डाॕ.संजय बोरुडे यांनी मांडली.कवयित्री रचना यांनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या .’सीतानवमी’ ‘बयो’ या त्यांच्या कविता विशेष गाजल्या.प्रश्नोत्तरे सत्रामध्ये त्यांनी आपल्या लेखनाची भूमिका उलगडली.
यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य ज्येष्ठ कवी प्रदीप पाटील ,ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक गौतमीपुत्र कांबळे ,ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी,कवी दयासागर बन्ने,कवी डाॕ.संजय बोरुडे,ज्येष्ठ कवी सुभाष कवडे,दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू,ज्येष्ठ समीक्षक विष्णू वासमकर,भीमराव पाटील,शाहीर पाटील,ज्येष्ठ कवयित्री निलांबरी शिर्के,प्रसिद्ध कवयित्री राजश्री पाटील,आमचे बंधू तानाजीराजे जाधव,कवी कुलदीप देवकुळे,अजित कुलकर्णी विनायक कुलकर्णी ,अविनाश सगरे,भरत खराडे,कवयित्री रचना,स्नेहा बोलगे,गझलकार मनीषा रायजादे-पाटील ,अश्विनी कुलकर्णी ,ज्येष्ठ कवयित्री अस्मिता इनामदार,ज्येष्ठ कवयित्री निर्मला लोंढे,वंदना हुलबत्ते,जस्मिन शेख,वैष्णवी जाधव,शांता वडेर,सुमेधा दिवाण,सुप्रिया मगदूम,उर्मिला शहा,डाॕ.अशोक अलगोंडी,माधुरी खोत,मोहन खोत ,राजेंद्र भोसले,शोभा माने ,यशवंत माळी,अनिलकुमार पाटील,आप्पासाहेब पाटील,विठ्ठल मोहिते,आनंदराव जाधव,राहुल पाटील,गजानन पाटील,मनीषा रायजादे-पाटील ,मनीषा पाटील,पत्रकार बंधू व कुटुंबीय उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.