प्रतिष्ठा न्यूज

पै. चंद्रहार पाटील प्रचारार्थ महाविकास आघाडीचा १५ रोजी मेळावा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उबाठा गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा पहिला मेळावा दिं.१५ ला आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात दुपारी तीन वाजता होणार आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत हा पहिला मेळावा होत असून शिवसेनेचे उपनेते आणि सांगली व सातारा जिल्ह्याचे संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आमदार डॉ विश्वजीत कदम, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. असे सांगून विभुते म्हणाले, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्रित उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात उतरणार आहेत या प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी हा मेळावा होत आहे या मेळाव्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तिकीट मिळवण्यापर्यंत स्पर्धा असते मात्र एकदा तिकीट फायनल झाल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षात किरकोळ मतभेद असले तर ते लवकरच संपतील आणि घटक पक्षातील सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात जोमाने उतरतील अशी अपेक्षाही विभुते यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा संघटक बजरंग पाटील उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.