प्रतिष्ठा न्यूज

संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी एकच चर्चा महिला मोर्चा ; घरोघरी जाऊन भूमिका मांडणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी आज महिला मोर्चा ची बैठक झाली. या बैठकीत एकच चर्चा महिला मोर्चा अशा घोषणा देत महिलांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा निर्धार केला.
ज्येष्ठ नेते दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर, भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढेपे-पाटील, माजी महापौर संगिता खोत, उज्वला चौगुले, सुप्रिया जोशी, जयश्री मगदूम, वैशाली पडळकर, सविता मदने, अपर्णा गोसावी, कोमल चव्हाण, सोनाली सगरे यांच्या सह महिला उपस्थित होत्या.
महिला मंडळे, बचत गट, महिलांच्या विविध सामाजिक संस्थाशी संपर्क करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीची भुमिका आणि विविध विकास कामांची माहिती देण्यात येणार आहे. शक्य होईल तेवढ्या महिलांनी एकत्र यायचे आणि प्रचाराला जायचे. संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी अत्यंत उत्साह दाखवत महिलांनी “एकच चर्चा महिला मोर्चा” अशा घोषणा देण्यात आल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.