प्रतिष्ठा न्यूज

शेकडो कोटींची विकासकामे करणाऱ्या संजयकाका पाटील यांना सगळ्यात जास्त मताधिक्य देण्याची सांगलीकरांना संधी : शेखर इनामदार; सांगली शहर जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात शेकडो कोटी रुपयांची विविध विकास कामे आपल्या सरकारने केले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची संधी सांगलीकरांना आली आहे. असे मत भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी व्यक्त केले. भाजपा सांगली शहर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.
यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, विश्वजीत पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रविण जाधव, दिगंबर जाधव, शहर उप चिटणीस मोहन वाटवे यांच्यासह शहर जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
बैठकीत पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या. शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी शरद देशमुख, बाळासाहेब पाटील, सदस्य पदी राजेंद्र कुंभार, सुनंदा राऊत, ज्ञ उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर, विक्रम पाटील यांना निवड पत्रे प्रदान करण्यात आली.
शेखर इनामदार म्हणाले, शेकडो कोटींची विकासकामे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगली महापालिका क्षेत्रात केली आहेत. त्यामुळे त्यांना सर्वात जास्त मताधिक्य देण्याची संधी आपल्याला आली आहे. सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी त्यासाठी प्रचारासाठी बाहेर पडावे. आपण केलेली विकास कामे लोकांना सांगा. पक्षाची भूमिका समजून द्या. आता एक एक माणूस प्रचारात सहभागी करून घ्या. सगळ्यात जास्त मताधिक्य सांगली महापालिका क्षेत्रातून द्यायचे आहे या जिद्दीने कामाला लागा. असे आवाहन शेखर इनामदार यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.