प्रतिष्ठा न्यूज

शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी शिक्षक सेना निर्णायक लढा देणार : राज्य उपाध्यक्ष- विठूभाऊ चव्हाण

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : दि.3 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा नांदेडची कार्यकारणीची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख- माधव पावडे यांच्या संपर्क कार्यालय येथे शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष- विठु भाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी,महिला प्रतिनिधी यांनी आपले मत मांडले
प्रास्ताविक सचिव रवि बंडेवार यांनी जिल्हात शिक्षक सेनेच्या चांगल्या कामगिरीमुळे अनेक शिक्षक प्रवेश करत आहेत व गेल्या सहा महीण्याचा आढावा सांगितला तर जिल्हाध्यक्ष संतोष अंबूलगेकर यांनी या बैठकीत मागील काळातील शिक्षक सेनेच्या वतीने सोडवण्यात आलेल्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. शिक्षक सेनेने केलेल्या मागण्या आणि त्यांना मिळत आसलेले यश निच्छितच शिक्षक सेनेचे भविष्य उज्ज्वल करण्याची नांदी आहे. शिक्षकांच्या सोडवण्यात आलेल्या प्रश्नांची माहीती दिली तर अध्यक्षीय भाषणात राज्य उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण यांनी प्रत्येक शिक्षकांच्या पाठीमागे निस्वार्थ तथा प्रामाणिक पणे शिक्षक सेना खंबीर पणे उभे आहे व प्रलंबीत शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी निर्णायक लढा देउन आधी कर्तव्य व नंतर हक्कासाठी लढणारी शिक्षक सेना आहे असे म्हणाले. प्रशासनाकडून वारंवार आश्वासन दिले जाते पण प्रश्न प्रलंबित आहेत, असे का? पुढील निर्णय काय घ्यायची या बाबत सर्वांनूमते खालील मुद्द्यावर निर्णय घेण्यात आले. लवकरच शिक्षक सेनेचे तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ठरले.
           खालील प्रश्न सोडवण्यासाठी
1)शिक्षण विस्तार अधिकारी पदे, केंद्रप्रमुख पदोन्नती, पदोन्नत मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक इत्यादी पदे तात्काळ भरणे. 2)निवडश्रेणी वेतन श्रेणी देणे. 3) विषय शिक्षकांना वेतनश्रेणी देणे. 4)जिल्हा बदली होऊन आलेल्या शिक्षक बांधवांना एक आगाऊ वेतनवाढ मिळणे. 5)जीपीएफ हफ्ते जमा करणे. 6) वैद्यकीय बिले निधी अभावी प्रलंबित आहेत ते निकाली काढणे. 7)थकीत वेतन तात्काळ काढणे. 8) वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले चे फाईल आरोग्य विभागात न पाठवणे याबाबत पत्र काढणे.9)महागाई भत्ता थकीत रक्कम मिळणे .
या सर्व प्रश्नांसाठी शिक्षक सेना आंदोलन करण्याचे ठरले तसेच शिक्षण सहकारी पतसंस्थेकडून जी संचालक पद रद्द करणे बाबतची नियमबाह्य नोटीस देण्यात आली आहे. त्या नोटीसी बाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तीव्र धरणे आंदोलन करण्याचे ठरले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष- मनोहर बंडेवार, जिल्हा कोषाध्यक्ष- गंगाधर कदम, जिल्हा उपाध्यक्ष- अविनाश चिद्रावार, जिल्हा मार्गदर्शक- शिवाजी पाटील, जिल्हा संघटक- संजय मोरे, प्रकाश कांबळे, जिल्हा सहसचिव- बालाजी लोहगावकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख- संतोष किसवे, लोहा तालुकाध्यक्ष- संभाजी पवार, नांदेडचे तालुकाध्यक्ष- प्रकाश फुलवरे, उपाध्यक्ष- भागोजी पुठ्ठेवाड, किनवट तालुका सरचिटणीस- दत्ता फोले, नायगाव तालुका पदाधिकारी- लक्ष्मण ब्रम्हकर, महिला प्रतिनिधी- शोभा गिरी मॅडम आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.