प्रतिष्ठा न्यूज

नावघाट पुलावरून तरुण- तरुणीचा उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न- जीवरक्षक दलाने वाचविले प्राण

प्रतिष्ठा न्युज/ वसंत सिरसाट
नांदेड : येथील जुने नांदेड भागातील नावघाट या पुलावरून तरुण- तरुणीचा उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची घटना आज दि.8 जुलै 2023 रोज शनिवारी सकाळी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जुने नांदेड भागातील नावघाट पुलावरून  युवक-युवतीने पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने घाट परीसरात जीवरक्षक दल तैनात केलेले आहे त्यामुळे जवळच असलेल्या गोदावरी जीव रक्षक दलाच्या 5 जीवरक्षकांनी नुर पहेलवान यांच्या मार्गदर्शनाखाली कुठलाही विलंब न होऊ देता त्या दोघांना पाण्यातुन सुखरूप बाहेर काढले आहे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्यामध्ये युवकाचे वय अंदाजे 22 वर्ष व युवतीचे वय अंदाजे 20 वर्ष असावे तसेच नावघाट पुलावर युवकाची शाईन कंपनीची मोटारसायकल क्रमांक- MH 26- AH 6581 हि उभी असुन सदरील या युवक युवतीने आत्महत्या  करण्याचा प्रयत्न का केला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे गोदावरी जीव रक्षक दलाचे अध्यक्ष सय्यद नुर यांनी आज शनिवारी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान सांगितले आहे, परंतु गोदावरी जीव रक्षक दलाच्या सतर्कते मुळेच सदरील या दोघांचे हि प्राण वाचले असल्यामुळे परीसरातील नागरीक हे गोदावरी जीव रक्षक दलाचे कौतुक आहे. हे दोघे तरुण- तरुणीलोहा तालुक्यातील शेवडी बाजीराव येथील असल्याचे समजते.
सदर घटना इतवारा पोलीस ठाण्या अंतर्गत असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.