प्रतिष्ठा न्यूज

तासगांव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांचे निर्देशानुसार आयोजित राष्ट्रीय लोकअदालत दि ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय तासगांव येथे आयोजित करण्यात आली होती.त्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना न्या.ओ एम माळी यांनी समझोत्याने वाद मिटवूया आणि ऐकमेकांसोबत आनंदाने जगूया असे आवाहन केले.या अवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत लोकांनी तडजोडी करुन वाद संपविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बँका,ग्रामपंचायत सोबतच कोर्टात सुरु असणाऱ्या केसमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला.
दावापूर्व प्रकरणांमध्ये बँकांचे थकीत कर्ज व ग्रामपंचायत चे घरपट्टी व पाणीबिल अशी एकूण ९५ प्रकरणे निकाली झाली. तसेच दाखल प्रकरणांध्येही लोकांनी समझोत्याने विचार करुन एकूण ८८ केस मध्ये तडजोडी झाल्या.या सर्वांमधून एकूण १ कोटी ५४ लाख ८६ हजार ८०८रु वसुल झाले.संसार म्हणजे २ चाकांचा रथ असतो,आणि हि दोन्ही चाके एकमेकांसोबतच असायला हवीत
हे पटल्याने कौटुंबिक हिंसाचाराच्या एका प्रकरणांध्ये यशस्वी समझोता झाला व त्यामुळे संसारातील गैरसमजाची दरी दूर होवून जोडपे आनंदाने घरी गेले.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री माळीसो यांचे नेतृत्वाखाली लोकअदालतचे सर्व कामकाज पार पडले.पॅनेल अॅडव्होकेट म्हणून श्री एस आर घारे यांनी अतिशय उत्कृष्ठ काम केले.तसेच तालुका विधी सेवा समितीचे सचिव श्री ए एस मोहिते यांचेही सहकार्य लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.