प्रतिष्ठा न्यूज

झोपलेल्या तासगाव बाजार समिती पदाधिकाऱ्यांना अखेर जाग : आर आर आबांच्या पुतळ्याचे कलर कामं सुरु

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव बाजार समितीच्या नियोजना अभावी समिती आवारातील स्वर्गीय आर आर आबांच्या पुतळ्याची दुरावस्था आणि तेथील परिसर अस्वच्छ असल्याचीं बातमी *प्रतिष्ठा न्यूज* ने प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या बाजार समितीच्या कारभाऱ्यांनी आबांच्या पुतळ्याच्या रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे.
महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते व तथा माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील आबा यांच्या पुतळ्याची व परिसराची दुरावस्था झाली होती.हि माहिती मिळताच तासगावचे नगरसेवक बाळासाहेब सावंत,तासगाव शहर युवक राष्ट्रवादी अध्यक्ष खंडू कदम,अमित पवार व पवन जाधव यांनी याठिकाणी येऊन पुतळ्याची व परिसराचीं स्वच्छता केली होती.यावेळी त्यांनी पुतळ्याची व तेथील परिसराचीं स्वच्छता राखली जावी अशी मागणी केली होती, तसेच आबांच्या पुतळ्याचे कलर कामं लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी केली होती.याची दखल स्वर्गीय आबांची कन्या स्मिता पाटील व युवा नेते रोहित पाटील यांनी घेऊन बाजार समितीला या पुतळ्याचे रंगकाम करण्यास सांगितले,त्याप्रमाणे आज हे काम सुरु झाले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.