प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतलेल्या रिल्स स्पर्धेचा निकाल जाहीर : शर्वरी लहादे यांचा प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यस्तरीय रिल्स स्पर्धा आयोजित केली होती. जेष्ठ सिने नाट्य अभिनेते डॉ. शरद भुताडिया, अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘रिल्स फॉर रॅशनॅलिटी’ या ऑनलाइन कार्यक्रमात सदर रील्स स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत ५७ रिल्स संपूर्ण महाराष्ट्रातून आल्या होत्या.

या स्पर्धेमध्ये शर्वरी लहादे (वारजे, पुणे) यांच्या रिल्सचा पहिला क्रमांक रु (७०००)दुसरा – गौरव शंभूस (डोंबिवली पूर्व)(रु ५०००), तिसरा क्रमांक सुनील शिंदे (सासवड जि. पुणे)रु ३०००, यांना जाहीर झाला. तर रु २००० ची प्रत्येकी २ उत्तेजनार्थ बक्षीसे शिवानी तरे (वसई पूर्व) व सुरज भोसले (थेरगाव, पुणे) यांना मिळाली आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सिनेनाट्य अभिनेत्री पर्ण पेठे हिच्या सहीचे प्रमाणपत्र दिले जाईल.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शरद भुताडिया यांनी विजेत्यांची नावे घोषित केली. याप्रसंगी बोलताना डॉ. भुताडिया यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावरील स्पर्धेच्या संकल्पनेचे कौतुक केले.या निमित्ताने तरुण वर्ग अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कामात सहभागी होतोय हे आनंददायी आहे. अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सोशल मीडियाचा समाज प्रबोधनासाठी वापर करणे साठी या रिल्स स्पर्धेचे आयोजन करणेत आले आहे असे सांगितले. या माध्यमाचा विधायक वापर केला तर तरुण पिढी पर्यंत आपला विचार पोहचू शकतो. डॉ. हमीद दाभोलकर पुढे म्हणाले की सोशल मिडिया हे माध्यम प्रभावी असले तरी याचे ही व्यसन लागू शकते. याबाबत आता सर्वांनी काळजी घ्यावी.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक वाघेश साळुंखे यांनी केले. पाहुण्यांची ओळख अजय मोकाशी यांनी करून दिली. तर सूत्रसंचालन अक्षिता पाटील, आभारप्रदर्शन राहुल माने यांनी केले.

या संपूर्ण स्पर्धेचे आणि ‘रिल्स फॉर रॅशनॅलिटी’ या कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोशल मीडिया विभागाने केले. त्यासाठी परिक्षक ऋषी पवार, अंनिस कार्यकर्ते समीर तांबोळी, पंकज पाटील,अजय मोकाशी, अमोल पाटील, राहुल थोरात, इत्यादींनी परिश्रम केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.