प्रतिष्ठा न्यूज

उन्हाची लाही अन् माहीची घाई: गगनबावडा परिसरात पै-पाहुण्याची ‘माही’ साठी गर्दी

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.१४ : ‘‘उन्हाची लाही अन् माहीची घाई’ संक्रात संपली की उन्हाचा पारा चढणारा माघ महिन्याचे आगमन होते .याच महिन्यात पै- पाहुण्यांना जेवणाचे आमंत्रण देण्याचा वर्षातील एक दिवस म्हणजे माघ महिन्यातील “माही” कोरोनाच्या काळात विस्कळीत झालेली माहीसाठी सध्या पाहुण्यांच्या घरी वर्दळ होत आहे.परंतु या वर्षी अनेक गावांनी मोठ्यांनी माही साजरी करण्याचे ठरवल्याने गावा-गावात माही दिवशी गर्दी असल्याचे चित्र दिसत आहे.गगनबावडा परिसरात सर्वच गावात माही साजरी केली जात नाही. ठराविक गावातच माही साजरी केली जाते.रविवार,मंगळवार ,शुक्रवार म्हणजे या माहीच्या दिवसाचा शुभ दिवस.त्या दिवशीच माही साजरी केली जाते.ज्या-त्या गावात प्रथेनुसार वार निवडला जातो.यावेळी गावात दुकाने व अल्प असा बाजार भरला जातो. या माहीला आपल्या सर्व पाहुण्यांना आमंत्रण दिले जाते.या पाहुण्यांना मटनाची जेवणावळ केली जातेच. पण या वेळी या पाहुण्यांना मद्याचीहि सोय केली जात होती.परंतु मद्य सेवनाने अनेक गावात पाहुणे –पाहुणे ,गावकरी –पाहुणे यांत छोट्याशा कारणास्तव वाद व्हायचे अन सगळ्या आनंदवर विरजण पडायचे.
माहीच्या सणाने अनेक लांब गावचे पाहुणे या निमित्य भेटतात. भेटी-गाठी होवून आपुलकी वाढण्यास मदत होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.