प्रतिष्ठा न्यूज

बारूळ ता.कंधार येथे बुधवारी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजन

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार

नांदेड दि.3 : कंधार तालुक्यातील मोजा बारूळ येथील संत नामदेव महाराज मठ संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज दिनांक 3 मे 2023 रोजी सकाळी ठीक11:30 वाजता सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याची नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस आणि वाढती महागाई यांमुळे सर्वसामान्य,मध्यमवर्गीय लोकांना आजच्या परिस्थितीमध्ये विवाह करणे कठीण आहे. विवाह पार पाडणे हे खर्चिक बाब झालेली आहे.अशा परिस्थितीत सर्वसामान्य गरीब लोकांना विवाह सोहळ्यासाठी लागणारा खर्च परवडत नाही .त्यामुळे नामदेव महाराज मठ संस्थानाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक विवाह सोहळ्याचा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असतो. विशेष म्हणजे विवाह साठी लागणारा सर्व खर्च नामदेव महाराज मठ संस्थान यांच्यावतीने करण्यात येत असतो. विशेषतः नवरी नवरदेवाचे मंगळसूत्र आहेर भांडीकुंडी आणि भोजनाचा खर्च सुद्धा या ठिकाणी मठ, संस्थान च्या वतीने करण्यात येत असतो .संत नामदेव महाराज यांचे आंध्र प्रदेश कर्नाटक आणि मराठवाडा या भागामध्ये हजारो शिष्यगण विखुरलेले आहेत. संत नामदेव महाराज यांना माननारा मोठा शिष्य वर्ग आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आव्हान संत नामदेव महाराज मठ संस्थान बारूळ ,संत नामदेव महाराज आणि समस्त गावकरी मंडळी बारूळ समस्त गावकरी मंडळी कवठा यांनी आवाहन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.