प्रतिष्ठा न्यूज

अयोध्या:श्रीराम प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने कंधार शहरात दि.22 जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार 
 नांदेड : कंधार तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरात दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त कंधार शहरातील श्रीराम मंदिरासह विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर व श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त  दि.२२ जानेवारी रोजी देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने कंधार शहर व तालुक्यात लोकोत्सव समितीच्या वतीने विविध
धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त दि. २१ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नगरेश्वर मंदिर कंधार येथे एकवीस हजार लाडूचा महाप्रसाद तयार करण्यात येणार आहे. यावेळी श्रीराम
आरती करून महाप्रसादाचा भोग चढवण्यात येणार आहे. दि.२२ जानेवारी रोजी सकाळी सहा ते बारा पर्यंत श्रीराम मंदिर कंधार येथे विधिवत पूजा, अभिषेक, ध्वज पूजन, शृंगार आरती च महाआरती श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच दुपारी बारा वाजता महापूजा व महाप्रसादाचा भोग चढवण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित भक्तांना श्री राम मंदिर अयोध्या येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी मोठे स्क्रीन छ, शिवाजी महाराज चौक व श्री राम मंदिर येथे लावण्यात येणार आहे.
शहरातील प्रत्येक गल्लीतील मंदिरांमध्ये २१००० लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता उत्तर प्रदेशातील भजनकार मनोज तिवारी यांचा भजनाचा कार्यक्रम भजन संध्या श्रीराम मंदिर या ठिकाणी होणार आहे. तसेच शहरातील सर्व मंदिरांबर रोषणाई करून प्रत्येक मंदिरासमोर आतिषबाजी करण्यात येणार आहे. या विविध कार्यक्रमास सर्व राम भक्तांनी उपस्थित रहावे असे आव्हान लोकोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
      त्याचप्रमाणे नांदेड शहरात मोठ्या उत्साहाने श्रीराम प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने गल्लोगल्ली सजावट करण्यात आली आहे. विशेष: पाटणकर नगर, विष्णुनगर, आनंद नगर, यंकटेशनगर नगर ( हिंगोली  गेट) आदि भागातील मंदीरात विधीवत पुजा,भजन,महाप्रसाद, महाआरती चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण सुद्धा करण्यात येणार आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.