प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पवार साहेबांना अध्यक्ष पदावर कायम राहण्याची विनंती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आज लोक माझे सांगाती भाग २ च्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.पवार साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आपण आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले,साहेबांनी हा घेतलेला निर्णय सध्याचा परस्थिती मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, महाविकास आघाडी तसेच देशातील सर्व राजकीय पक्ष्यांना धक्का देणारा आहे.सध्याच्या राजकीय अस्थिर परिस्थितीमध्ये देशाचे नेतृत्व पवार साहेबांनी करावे व देशातील लोकशाही न्याय व्यवस्था आणि संविधान यांचे संरक्षण त्यांच्या नेतृत्वाखाली करावे अशी भावना देशातील सर्व विरोधी पक्षातील नेते करत असतात.शरद पवारां सारख्या अनुभव संपन्न नेतृत्वाने आपल्या पक्ष्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा हि अत्यंत दुर्दैवी घटना आहे.
त्यामुळे आ.सुमनताई आर.आर. पाटील यांच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, पवारसाहेब प्रेमी यांनी एकत्रित येऊन आपण आम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अध्यक्ष पदावर कायम राहून आम्हाला मार्गदर्शन करावे अशा भावना व्यक्त केल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचें तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, शहराध्यक्ष ऍड गजानन खुजट, अमोल नाना शिंदे,एम बी पवार सर, रवींद्र पाटील, अभिजित माळी,इद्रिस मुल्ला, बाबासाहेब पाटील,तसेच सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.