प्रतिष्ठा न्यूज

नाट्यकलेचा जागर- नाट्यपरिषदेतर्फे विविध स्पर्धा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय मराठी नाट्य परिषद ही रंगभूमीची मध्यवर्ती संघटना ११८ वर्षांपासून अधिक काळ अविरतपणे रंगभूमीची सेवा करणाऱ्या नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे रंगकर्मींच्या अडचणी सोडवणे सोडवणे ,त्यांना आर्थिक मदत करणे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि नाट्य संस्थांना मार्गदर्शन करणे हा नाट्य परिषदेचा मुख्य हेतू आहे. आज पर्यंत नाट्य परिषदेने ९९ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन भारतातील विविध ठिकाणी तसेच परदेशातही यशस्वीरित्या केले आहे. आणि नाट्य चळवळीस वेगळी दिशा दिली आहे. नाट्य परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम कायमच राबवले जातात. विविध स्पर्धांचे, नाट्य शिबिरांचे, महोत्सवांचे आयोजन केले जाते .शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नाट्यकलेचा जागर महाराष्ट्र भर करण्याचा मानस नाट्य परिषदेचा असून या अंतर्गत एकांकिका ,बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्य-अभिवाचन ,नाट्यसंगीत पद गायन या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे .या निमित्ताने नाट्य कलावंतांसाठी एक भव्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे .तसेच रसिकांनाही याचा आस्वाद घेता येणार आहे. नाट्य जागर महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यपद गायन आणि नाट्य अभिवाचन या विविध प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा प्राथमिक फेरी उपांत्य फेरी व अंतिम फेरी या स्वरूपात संपन्न होईल .सर्व स्पर्धा फक्त मराठी भाषेतच होतील. विजेत्या कलाकृतींचे शतक महोत्सवी नाट्य संमेलनात सादरीकरण होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मराठी रंगभूमीवरील दिग्गज कलावंत ,दिग्दर्शक, आणि निर्माते उपस्थित राहणार आहेत. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ९ एकांकिकांना मराठी रंगभूमीवरील नऊ दिग्गज दिग्दर्शक हे प्रत्येकी एक याप्रमाणे किमान चार दिवस मार्गदर्शन करणार आहेत .सर्व सहभागी कलावंतांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज, प्रवेश फी ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारली जाणार आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. स्पर्धेची संपूर्ण माहिती तसेच प्रवेश अर्ज www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील तसेच अंतिम फेरीतील विजेत्यांना वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपाची भरघोस पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या स्पर्धांसाठी प्राथमिक आणि अंतिम फेरीसाठी एकुण २५ लाख रुपयांची रोख पारितोषिके तसेच स्मृतचिन्हे आणि प्रमाणपत्रे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यस्तरावरील होणाऱ्या या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त कलाकारांनी आणि संघाने सहभाग घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 9423003951 किंवा 8888265265 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.