प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात संयोगिता पाटील यांची जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज 
मिरज प्रतिनिधी : गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, मिरज येथे केंब्रिज स्कुलच्या संस्थापिका कै. सौ. संयोगिता पृथ्वीराज पाटील यांची 55 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी फोटोपुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी डॉ. राजेंद्र मेथे यांनी वहीनींच्या आठवणींना उजाळा दिला, वहीनी या धाडसी व्यक्तीमत्व, शिस्तप्रिय होत्या.  शिक्षणाची ओढ, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार इतक्यांवर न थांबता बदलत्या युगानुसार शिक्षणाचा प्रवाह बदलला पाहिजे असा प्रयत्न करणा-या वहीनी होत्या.  त्यांची आठवण आमच्या स्मृतीत कायम राहील.
यावेळी कॅम्पस कोऑडीनेटर सतिश पाटील, प्राचार्य डॉ. बी. एन. कराळे, फिजीओथेरपी कॉलेजचे प्राचार्य, डॉ. चंद्रशेखर एल., सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.